यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 11:19 AM2019-12-21T11:19:37+5:302019-12-21T11:31:43+5:30

महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे.

Raj Thackeray comments on mahavikas aghadi | यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे 

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे 

googlenewsNext

पुणे- महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. अशा प्रकारची प्रतारणा भाजपाने केली, शिवसेनेने केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचारायलाच नको, असं म्हणत मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 24 तारखेला पवारांची पावसातली सभा झाली आणि मग अनेक विशेषण लावण्यात आली.

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला कोपरखळी मारली आहे. निवडणुका झाल्यापासून काही बोललो नव्हतो. जे काही चालू होतं ते बघून माझीच नव्हे तर महाराष्ट्राची वाचा खुंटली होती. 23 तारखेच्या मनसेचा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी आहे. 23 जानेवारीला मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईला पार पडणार आहे. तिथे जे काही बोलायचे ते मत मांडेनच, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

निवडणुकीसाठी पक्षांतर केलेले जनतेने पाडले. जनतेने अशांना जागा दाखवली आणि पुढे नशिबात असे काही असेल असे जनतेला वाटलेही नसेल. फार काही चालणार नाही, लोकांच्यात नाराजी आहे, असं म्हणत महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नसल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सूचित केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमधून किती मुस्लिम आले हे तपासून बघायला हवे. त्यांच्या सोयी लावण्यासाठी देश नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत धर्मशाळा नाही. बांगलादेशातील नागरिकांना हाकलून दिलेच पाहिजे. असले कायदे आणून गोंधळ घालायची गरज नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशातले लोक इथे आणण्याची गरज नाही. दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यावर आपल्याला हे मुद्दे आठवतात. असे काही कडक पावले उचलावे लागतील अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. केंद्र सरकार, भाजप आणि इतर पक्षांनी राजकारण करू नये, असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे. 

Web Title: Raj Thackeray comments on mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.