Raj Thackeray: शिवजयंती कशी साजरी करायची? तारखेनुसार की तिथीनुसार, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगिलतं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:40 PM2022-03-09T20:40:37+5:302022-03-09T20:43:08+5:30

Raj Thackeray News: राज ठाकरें यांनी शिवजयंतीच्या मुद्द्यावर मनसेची भूमिकाही स्पष्ट केली. तसेच येत्या २१ मार्च रोजी शिवजयंती तिथीनुसार धुमधडाक्यात साजरी करा, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले.

Raj Thackeray: How to celebrate Shiv Jayanti according to the Tithi or the date, Raj Thackeray clearly says, said ... | Raj Thackeray: शिवजयंती कशी साजरी करायची? तारखेनुसार की तिथीनुसार, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगिलतं, म्हणाले...

Raj Thackeray: शिवजयंती कशी साजरी करायची? तारखेनुसार की तिथीनुसार, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगिलतं, म्हणाले...

Next

पुणे - जवळपास दोन वर्षांनंतर जाहीर सभा घेणारे राज ठाकरे यांनी आज मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या जाहीर सभेमध्ये विविध मुद्द्यांवरून तुफान राजकीय फटकेबाजी केली. यावेळी राज ठाकरें यांनी शिवजयंतीच्या मुद्द्यावर मनसेची भूमिकाही स्पष्ट केली. तसेच येत्या २१ मार्च रोजी शिवजयंती तिथीनुसार धुमधडाक्यात साजरी करा, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले.

राज ठाकरे म्हणाले की, २१ मार्च रोजी शिवजयंती आहे. शिवरायांमुळे आपली ओळख आहे. आम्ही कोण? आम्ही मराठी भाषा बोलणारे लोक शिवछत्रपतींनी ज्या भागात राज्य केले त्या भागात राहतो. शिवजयंती कधी साजरी करावी, असा प्रश्न विचारला जातोय. शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार साजरी करायची असा प्रश्न विचारला जातोय. मी तर म्हणतो ३६५ दिवस शिवजयंती सारजी करा. शिवजयंती ही तिथीनुसार साजरी केली गेली पाहिजे. कारण शिवजयंती ही आपल्यासाठी एक सण आहे.

आपले सण हे तिथीनुसार साजरे केले जातात. गणेशोत्सवर हा तिथीनुसार होतो. गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवाची तारीख आणि यावर्षीच्या गणेशोत्सवाची तारीख ही वेगवेगळी येते. आपल्या राजाचा जन्मदिवस हा सण आहे. ती कुणाची जयंती नाही. त्यामुळे येत्या २१ मार्च रोजी धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. 

Web Title: Raj Thackeray: How to celebrate Shiv Jayanti according to the Tithi or the date, Raj Thackeray clearly says, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.