राज ठाकरेंनी दाखवला माेदींची पाेल खाेलणारा व्हिडीओ अन सुरु झाल्या ''चाैकीदार चाेर हे'' च्या घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 09:32 PM2019-04-18T21:32:33+5:302019-04-18T21:37:03+5:30

पुण्यात ठाकरे यांनी आज सभा घेतली त्यावेळी ठाकरे जेव्हा व्हिडीओ दाखवत हाेते आणि माेदींवर टीका करत हाेते, तेव्हा जनतेतून चाैकीदार चाैर हे च्या घाेषणा देण्यात येत हाेत्या.

Raj Thackeray showed they video criticising modi ; audience starts shouting choukidar chor he | राज ठाकरेंनी दाखवला माेदींची पाेल खाेलणारा व्हिडीओ अन सुरु झाल्या ''चाैकीदार चाेर हे'' च्या घाेषणा

राज ठाकरेंनी दाखवला माेदींची पाेल खाेलणारा व्हिडीओ अन सुरु झाल्या ''चाैकीदार चाेर हे'' च्या घाेषणा

Next

पुणे : राज ठाकरे राज्यभर विविध भागांमध्ये सभा घेत आहेत. त्यात ते भाजपाच्या विविध याेजनांची तसेच माेदींनी केलेल्या वक्तव्यांची व्हिडीओ क्लिप दाखवत आहेत. राज ठाकरेंच्या सभांना माेठा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात ठाकरे यांनी आज सभा घेतली त्यावेळी ठाकरे जेव्हा व्हिडीओ दाखवत हाेते आणि माेदींवर टीका करत हाेते, तेव्हा जनतेतून चाैकीदार चाैर हे च्या घाेषणा देण्यात येत हाेत्या.


राज ठाकरे आपल्या सभांमध्ये भाषणांबराेबरच व्हिडीओच्या माध्यमातून भाजपाची पाेलखाेल करत आहेत. प्रत्येक भाषणात ते व्हिडीओ दाखवत असल्याने नागरिकांमध्ये ते नवा कुठला व्हिडीओ घेऊन येणार याबाबत उत्सुकता असते. राज ठाकरेंचा लाव रे व्हिडीओ हे वाक्य साेशल मिडीयात चांगलेच फेमस झाले आहे. आजच्या भाषणात देखील राज ठाकरे लाव रे व्हिडीओ म्हणताच जनतेतून एकच जल्लाेष झाला. 

ठाकरे भाजपाच्या विराेधात राज्यातील विविध मतदार संघामध्ये सभा घेत आहेत. या सभांमध्ये ते माेदींवर जाेरदार टीका करत आहेत. पुण्यात आयाेजित सभेत त्यांनी विविध व्हिडीओ दाखवून माेदी आणि भाजपावर टीका केली. यावेळी प्रत्येक व्हिडीओ दाखवल्यानंतर जनता चाैकीदार चाेर हे च्या घाेषणा देताना दिसली. तसेच ठाकरे आज कुठला व्हिडीओ दाखवणार याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून आली. 

दरम्यान उद्या राज ठाकरे रायगड मध्ये सभा घेणार असून ठाकरे आता नवीन कुठले व्हिडीओ घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: Raj Thackeray showed they video criticising modi ; audience starts shouting choukidar chor he

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.