राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:07 PM2021-07-21T15:07:40+5:302021-07-21T15:19:24+5:30

महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्राचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले.

Raj Thackeray was seen wearing a mask in Pune yesterday; Forget all the masks including Thackeray at today's inauguration | राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले

राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले

Next
ठळक मुद्देठाकरेंनी चक्क पहिल्यांदा मास्क घातल्याचे आले होते निदर्शनासअखेर राज ठाकरेंनी मास्क घातल्याची सर्वत्र चर्चा आजच्या उदघाटन कार्यक्रमाला राज ठाकरेंसोबतच सर्वांना मास्कचा विसर

पुणे: राज ठाकरे नेहमी विनामास्क फिरताना दिसत असतात. गेल्या तीन दिवसापासून ते पुणे दौऱ्यावर आहेत. ठाकरे काल बाबासाहेब पुरंदरेंना भेटायला गेले होते. तेव्हा चक्क पहिल्यांदा त्यांनी मास्क घातल्याचे निदर्शनास आले. अखेर राज ठाकरेंनी मास्क घातल्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली होती. मात्र महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्राचे उदघाटन कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यासोबतच अन्य पदाधिकारी मास्क न घातल्याचे दिसून आले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आज पार पडला. यावेळी कोणीही मास्क वापरले नव्हते.

कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सरकारकडून वारंवार मास्क घालण्यासह कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. पण, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नेहमीच या नियमांचा विसर पडल्याचं दिसतं. ते सार्वजनिक ठिकाणी मास्क घातलेले दिसत नाहीत. पण काल तारखेला पुण्यात मास्क घातलेले राज ठाकरे पाहायला मिळाले होते.

आज सकाळी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्राच्या उदघाटनप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक वसंत मोरे आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पदाधिकारी आणि त्यांनी पूर्ण केंद्राची पाहणी केली. 

सरकारकडून सतत कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्यास सांगितले जाते. पण, राज ठाकरे याला अपवाद आहेत. ते नेहमीच कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मात्र आता त्यांच्यासमवेत इतर राजकीय नेते आणि कार्यकर्ते मास्क न घातल्याचे चित्र दिसून आले आहे. 

Web Title: Raj Thackeray was seen wearing a mask in Pune yesterday; Forget all the masks including Thackeray at today's inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.