Raj Thackeray | पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' 13 अटी, उल्लंघन झाल्यास कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:17 PM2022-05-21T18:17:48+5:302022-05-21T18:38:07+5:30

अटींचे उल्लंघन झाल्यास होणार कारवाई...

raj thackerays ganesh kala hall speech action taken in case of violation of 13 conditions for meeting | Raj Thackeray | पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' 13 अटी, उल्लंघन झाल्यास कारवाई

Raj Thackeray | पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' 13 अटी, उल्लंघन झाल्यास कारवाई

Next

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरेंची उद्या (रविवारी) पुण्यात सभा होत आहे. ही सभा गणेश कला क्रिडाच्या सभागृहात सकाळी १० वाजता होणार आहे. यापूर्वी ठाकरेंची सभा २१ मेला म्हणजे आज सायंकाळी होणार होती. पण ती रद्द करण्यात आली होती. आता उद्या सकाळी ही सभा होणार आहे. या सभेसाठी पुणे पोलिसांनी १३ अटी ठेवल्या आहेत. जर या अटींचे उल्लंघन राज ठाकरे किंवा आयोजकांकडून झाले तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे. या १३ अटी नेमक्या कोणत्या ते पाहू...

सभेसाठी असणाऱ्या १३ अटी-

१. सदर जाहीर सभा दि.२२/०५/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते १४.०० वा पर्यंतच्या कालावधीमध्ये आयोजित असून सदर कार्यक्रमस्थळ व वेळेत कोणताही बदल करु नये.

०२. सभेत सहभागी होणारे वक्त्यांनी भाषण करताना दोन समाजामध्ये धार्मीक, जातीय तेढ निर्माण होईल तसेच विशिष्ट समाजाच्या व व्यक्तीच्या धार्मीक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.

०३. सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा वंश, जात, भाषा, प्रदेश, जन्मस्थान किवां ते पाळत असलेल्या रुढी पंरपरांचा अपमान होणार नाही किंवा त्यांना चिथावणी दिली जाणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे.

०४. सभेमध्ये सामील होणारे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक यांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच सभास्थळी वेगवेगळ्या भागातून येताना किंवा जाताना इतर धर्म/जाती/पंथ यावर टीका टिप्पणी तसेच कार्यक्रमस्थळी हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाहीत, तसेच सभेच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य, खाणाखुणा तसेच निशाणी दाखवणार नाहीत.

०५. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शन करू नये शस्त्र अधिनियमातील कायदेशीर तरतुदीचे उल्लघंन होणार नाही याची काळजी घेतील.

०६. अट क्रं ०२ ते ०५ याबाबत सभेत सहभागी होण्या-या संबधिताना कळविण्याची व अटी शर्थीबाबत अवगत करण्याबाबतची जबाबदारी संयोजकाची राहील.

०७. सदर कार्यक्रमास आयोजकांनी स्वंयसेवक नेमावेत व ते येणा-या नागरिकांना योग्य त्या सूचना देतील तसेच त्यांचे आसनव्यवस्थेच्या ठिकाणावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होणार नाही. क्षमतेपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित करु नये, जेणेकरून गोधंळ, अव्यवस्था, चेंगराचेंगरी असा अनुचित प्रकार टाळता येईल. तसा अनुचित प्रकार घडल्यास आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

०८. सभेच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक जागी लावण्यात येणारे स्वागत फलक हे ट्रॅफिकला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने लागणार नाहीत याबाबत दक्षता घेतली पाहिजे.

०९. आयोजकांनी मुख्य व्यासपीठावर उपस्थितांची संख्या नियोजित व निश्चित ठेवावी. त्याबाबत वेळेत पोलीस विभागास अवगत करावे जेणेकरुन अनपेक्षीत कुणीही अनोळखी व्यक्ती व्यासपीठावर येवून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणार नाही याबाबत काळजी घेतील.

१०. सभेच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या आवाजाचे मर्यादेबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तसेच सभेसाठी वापरण्या येणा-या ध्वनीक्षेपकाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्देश व ध्वनीप्रदूषण नियंत्रण व नियमन) नियम २००० परिशिष्ठ नियम ३ (१), ४(१) अन्वये नियमाचे पालन करावे.

११. सभेच्या ठिकाणी येणा-या लोंकाची सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून फ्रिस्कींग चेंकीग करण्याचा अधिकार पोलीसांना राहिल त्यामध्ये कोणताही व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

१२. सदर कार्यक्रमादरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. अॅब्युलन्स, दवाखाना, बस सेवा, दळणवळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

१३. सभेच्या ठिकाणी येणा-या महिला, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले यांचे आसनव्यवस्थेबाबत योग्य ती काळजी घ्यावी व त्यांना स्वतंत्र आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी इ. आवश्यक सुविधा मिळतील याबाबत प्रयत्न करतील.

Web Title: raj thackerays ganesh kala hall speech action taken in case of violation of 13 conditions for meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.