शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 05:51 PM2021-08-14T17:51:10+5:302021-08-14T18:05:48+5:30

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा महापुरुष : राज ठाकरेंनी उधळली स्तुतीसुमनं

Raj Thackeray's reply to those who object to the history of Shivshahir Babasaheb Purandare; | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले...

googlenewsNext

पुणे : बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तिमत्वाला ६ वर्षांचा असताना पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर त्यांना पाहत आणि वाचतच राहिलो. त्यांच्याकडून अनेकदा इतिहासातले प्रश्न समजून घेतले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ज्यावेळी इतिहास सांगतात तेव्हा ते वर्तमानात कसे भानावर या हे ही आवर्जून सांगतात. त्याचवेळी इतिहासातल्या चुका पुन्हा करू नका असेही सांगतात. त्यांच्या इतिहासात दंत कथांना अजिबात वाव नाही, अशा शब्दात पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिले. 

आपल्या अमोघ वाणीतून शिवचरित्र घराघरात पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त ’जीवनगाणी’, ’जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ’स्वरगंधार’ या संस्थांच्या वतीने पुरंदरे यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अद्वितीय सुरांची देणगी लाभलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते शिवशाहिरांचे 99 व्या ज्योतींनी औक्षण करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार व माजी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, नुसता इतिहास ऐकायला गेले की रुक्ष वाटते, पण त्यांच्याकडून ऐकताना प्रसंग डोळ्यासमोर जिवंत होतात. बाबासाहेब म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा हा महापुरुष आहे. बाबासाहेबांकडून इतिहास समजून घ्यायला हवा. त्यांनी कधी इतिहासाला सोडले नाही. त्यांच्या इतिहासात दंतकथांना वाव नाही. त्यांनी अलंकारिक भाषा वापरली नसती तर ते किती कठीण होते हे कळले नसते.तुमच्या डोक्यात गोष्ट पक्की बसवतात.शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात नि मनामनात पोहोचविले. एकदा विचारलं होत की तुम्ही पोवाडा म्हटला नाही तर शिवशाहीर कसे? इतिहास सांगण्यातून बोध घ्यावा.

राज ठाकरेंच्या भाषणाची 'हटके' सुरुवात 
मनसेप्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमी जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतात. मात्र आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची 'हटके' सुरुवात केली. त्यांनी अर्ध्या चेहऱ्याच्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या बांधवांनो अशी भाषणाची सुरुवात केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, इतिहासकार, संशोधक, शाहिर, चित्रकार, कीर्तनकार सगळी रूपं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात दडली आहेत. ते स्वतः सहनशील, दयावान आणि क्षमाशील आहेत. लेखनावर प्रहार केले असतील पण काहीही न बोलता जगून दाखवले, हा खूप मोठा गुण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे, समानता हवी असे सांगतानाच त्यांनी स्वतः जगून दाखविले आहे.

मेहेंदळे म्हणाले, ते इतिहास संशोधक आहेत ही त्यांची ओळख शिवशाहीर म्हणून झाकोळली आहे..ते इतिहास संशोधक मंडळाच्या विद्यापीठातील आहेत. मंडळाच्या त्रैमासिकात लेख प्रसिद्ध झाले..मंडळाच्या विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर ते ' शिवचरित्र' लिहू शकले. इतिहास रुक्ष भाषेत लिहिला जायला हवा असे नाही.मला जेव्हा 100 वर्षे लागतील तेव्हा बाबासाहेबांनी मला आशीर्वाद द्यावा.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणाल्या, पाया पडावे अशी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे बाबासाहेब दीड वर्षांनी बाहेर पडले आहे. मी फार शिकलेली नाही पण लेखांमुळे मराठी बोलता येते. साने गुरुजी, ह. ना आपटे, खांडेकर, बंगालची पुस्तके वाचली..वाचनाची खूप आवड होती..लेखकांना भेटण्याची ओढ वाटायची..1943 साली दहा वर्षांची असताना गाण्याचे पाहिले रेकॉर्डिंग केले..बहिणीचे लग्न कोल्हापूरला होते. गो. नी दांडेकर भेटले.पाठीमागून एक व्यक्ती हसले.आम्हाला आमचे वाढदिवस लक्षात राहात नाही आणि शिवाजी महाराजांचा वाढदिवस किंवा सगळं कसे लक्षात ठेवता? असा भाबडा प्रश्न केला. त्यांना मी आवडले. 58 वर्षांची बाबासाहेबांशी ओळख आहे.मी कुणाला मागत नाही, फक्त प्रेम मागते. 

 

बाबासाहेबांनी शंकराची पिंड दिल्यानंतर आयुष्य खूप छान झाले.ते फूल टवटवीत राहिलं पाहिजे..कुणाला त्रास द्यायचा नाही.मन स्वच्छ ठेवायचे.बाबासाहेब यांनी खूप प्रेम दिले.लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केले. देवाने मला आयुष्याची 50 वर्षे दिली आहेत..त्यातील २५ वर्षे बाबासाहेबाना देत आहे. त्यांना १ लाख रुपये देत आहे.

बाबासाहेब म्हणाले, लताने तुम्हाला कुणाचा आवाज आवडतो? मी थोडा थांबलो आणि ' कपबश्या' चा आहे असे म्हणालो.मंगेशकर कुटुंबीय आणि गो.नी. दांडेकर यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे.वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. मी वेगळं काही करतोय असे वाटत नाही.मी शिवाजींचा पुजारी नाहीये.शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे सर्वजण भारावतात..पुन्हा एकदा जन्माला यावं.. प्रेम करायला शिका प्रेम शिकवता येत नाही, ते आतून यावे लागते..राग, द्वेष नको

Web Title: Raj Thackeray's reply to those who object to the history of Shivshahir Babasaheb Purandare;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.