राज ठाकरेंचा 'कानमंत्र' मनसे कार्यकर्त्यांना बळ देणार ; पुण्यात निवडणुकांसाठी मनसेची मोर्चेबांधणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 06:52 PM2021-07-17T18:52:52+5:302021-07-17T19:46:11+5:30

राज ठाकरेंचा तीन दिवसीय पुणे दौरा ,कार्यकर्त्यांशी साधणार 'मनसे' संवाद..

Raj Thackeray's will strengthen MNS in Pune; MNS's Preparation for upcoming elections | राज ठाकरेंचा 'कानमंत्र' मनसे कार्यकर्त्यांना बळ देणार ; पुण्यात निवडणुकांसाठी मनसेची मोर्चेबांधणी  

राज ठाकरेंचा 'कानमंत्र' मनसे कार्यकर्त्यांना बळ देणार ; पुण्यात निवडणुकांसाठी मनसेची मोर्चेबांधणी  

Next
ठळक मुद्देकोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्यांचा होणार सत्कार

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मागील चार वर्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौऱ्यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.

मनसेला २०१२ झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये पुणेकरांनी साथ देत तब्बल २९ नगरसेवक निवडून दिले होते. मात्र, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ही संख्या अवघी दोन नगरसेवकांवर आली. पक्षाच्या संघटनात्मक कामातही मोठ्या प्रमाणावर मरगळ आली होती. स्थानिक पदाधिका-यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली होती. ही गटबाजी विधानसभा निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीमध्येही प्रकर्षाने समोर आलेली होती. पक्षाचे नेतृत्वही संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पदाधिकारी खासगीत बोलत होते.

विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला चमकदार कामगिरी करता आली नाही. आता, पालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद आजमावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील बारा ते चौदा महापालिकांच्या संभाव्य निवडणुकांसाठी मनसेने पुन्हा जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आता राज्यभर दौरे करु लागले आहेत. नाशिकचा दौरा संपल्यानंतर ठाकरे पुणे दौ-यावर येत आहेत.

ठाकरे हे रविवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाल्यानंतर सोमवारी व मंगळवारी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. तसेच बुधवारी कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून त्यांचा सन्मान करणार आहेत. आगामी निवडणुक आणि संघटनात्मक बांधणीविषयी गांभीर्याने चर्चा केली जाणार असल्याचे मनसे नेते राजेंद्र वागसकर व शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
===
राज ठाकरे हे सोमवारी सकाळी वडगाव शेरी व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर, दुपारी कोथरूड व खडकवासला मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. मंगळवारी सकाळी हडपसर व कॅन्टोन्मेंट मतदार संघ, तर दुपारी  कसबा व पर्वती मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. 

Web Title: Raj Thackeray's will strengthen MNS in Pune; MNS's Preparation for upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.