मावळ्यांसह राजे निघाले रायगडला

By admin | Published: May 31, 2017 02:50 AM2017-05-31T02:50:53+5:302017-05-31T02:50:53+5:30

शिवनेरीहून रायगडला निघालेल्या छत्रपती शिवाजीमहाराज पायी पालखी सोहळ्याचे मंगळवारी दुपारी ‘लोकमत’तर्फे स्वागत करण्यात

Raja with Mavalaya came to Raigad | मावळ्यांसह राजे निघाले रायगडला

मावळ्यांसह राजे निघाले रायगडला

Next

धायरी : शिवनेरीहून रायगडला निघालेल्या छत्रपती शिवाजीमहाराज पायी पालखी सोहळ्याचे मंगळवारी दुपारी ‘लोकमत’तर्फे स्वागत करण्यात आले.
शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा पालखी सोहळा दुपारी सिंहगड रस्त्यावरून मार्गस्थ झाला. वडगाव खुर्द येथील लोकमत प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी सोहळ्याचे स्वागत केले. पालखीसोबत असलेल्या मावळ्यांनी लोकमतच्या निसर्गरम्य आवारात तासभर विश्रांती घेतली. या वेळी कर्मचाऱ्यांतर्फे मावळ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. आनंद जवळकर, अर्जुन गवळी, सुरेश सावंत, जितेंद्र कुलकर्णी, व्यंकटेश साबळे, नवनाथ शिर्के, दीपक वाडकर, बबन शिंदे आदींनी सोहळ्याचे स्वागत केले.
शिवनेरीहून पायी निघालेला हा पालखी सोहळा ६ जूनला राज्यभिषेकदिनी रायगडावर पोहोचणार आहे, अशी माहिती शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर, नितीन हेंद्रे, हेमंत यादव यांनी दिली. २४ मे रोजी हा सोहळा शिवनेरीपासून निघाला आहे.
या वेळी नीरज महाजन, भगवान तहकीक, जितेंद्र कुलकर्णी, साईनाथ शिंदे, राजेश पोदुतवार, विलास बुचडे, आबासाहेब महाडिक, अमर बीडकर, ऋषिकेश पानगावकर, मिलिंद बोके, अशोक लेकुरवाळे, गोरक्षनाथ खुटवड, सुधीर मुळीक, राजीव जगताप, संजय तिबिले, राहुल पुंडे, व्यंकटेश पदमवार, वर्षा जाधव, बी. एन. शिंदे, भरत पारकर, अक्षय गायकवाड, गणेश मोंडेवाड, दत्ता गायकवाड, प्रवीण कदम, योगेश तारू, विनायक सुतार, राहुल हगवणे, सुरुची वाघ, रवी आगलावे, योगेश साठे, प्रताप मोरे, अमित कुंभार, आकाश कुडले, नीलेश कांबळे, नितू चव्हाण, संदीप धुमाळ, कुमार चव्हाण, शशिकांत झुगम, महेश चव्हाण, शुभम सुतार, प्रमोद धाराशिवकर, नितीन खाडे, धीरज दळवी, भास्कर लांडे, भास्कर खळदकर, मोहन शिंदे, श्रीमंत कस्पटे, प्रज्योन काळोखे, अतुल चव्हाण, राहुल गायकवाड, गणेश सणस, स्वदेश पन्हाळकर, अशोक गोरे, सागर गोरे, विशाल पालेकर, प्रणव नवले, गणेश मरगळे, अमोल पाळेकर, ओंकार दुधाने, विनायक माळी, दिनेश कांबळे, नीलेश डोंगरे, गणेश ढेरे, मोतीराम कुंडकर, अनंता डवले, भरत ढेरे, संतोष होगेकर, संतोष सपकाळ, सुरेश माळी, नागनाथ वंदुले, समाधान कोळेकर, गणेश शेडगे, विनोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Raja with Mavalaya came to Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.