प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या कार्यालयातील फलकांना फासले काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 10:06 PM2017-09-25T22:06:19+5:302017-09-25T22:06:35+5:30
प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित ' हलाल' या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आवामी विकास पार्टीच्या चार मुस्लिम तरुणांनी राजन खान यांच्या कार्यालयात घुसून फलकांना काळे फासल्याचा प्रकार घडला.
पुणे, दि. २५ - प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित ' हलाल' या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आवामी विकास पार्टीच्या चार मुस्लिम तरुणांनी राजन खान यांच्या कार्यालयात घुसून फलकांना काळे फासल्याचा प्रकार घडला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
राजन खान कार्यालयात उपस्थित नव्हते. तिथे नोकरीस असणाऱ्या बाईला त्यांनी दमबाजी केली. राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित ' हलाल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुस्लिम समाजावर आधारित या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे पण ते फोन उचलत नाहीत असे सांगून त्या तरुणांनी व्हिजिटिंग कार्ड ठेवून दिले आणि पत्रके टाकली. हे तरुण आवामी विकास पार्टीचे असल्याचे समजते. यासंदर्भात राजन खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित ' हलाल' या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आवामी विकास पार्टीच्या चार मुस्लिम तरुणांनी राजन खान यांच्या अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून फलकांना काळे फासल्याचा प्रकार घडला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
राजन खान कार्यालयात उपस्थित नव्हते. तिथे नोकरीस असणाऱ्या बाईला त्यांनी दमबाजी केली. राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित ' हलाल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुस्लिम समाजावर आधारित या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे पण ते फोन उचलत नाहीत असे सांगून त्या तरुणांनी व्हिजिटिंग कार्ड ठेवून दिले आणि पत्रके टाकली. हे तरुण आवामी विकास पार्टीचे असल्याचे समजते. यासंदर्भात राजन खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.