पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र दाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:12 AM2021-02-25T04:12:31+5:302021-02-25T04:12:31+5:30
अकरा सदस्य असलेल्या पिंपरखेड ग्रामपंचायतीची सदस्य निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र सरपंचपदी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष ...
अकरा सदस्य असलेल्या पिंपरखेड ग्रामपंचायतीची सदस्य निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र सरपंचपदी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी सरपंच राजेंद्र दाभाडे यांच्या काळात गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली होती. म्हणून तरुण वर्गानी पुन्हा एकदा सरपंचपदी राजेंद्र दाभाडे यांची वर्णी लागावी म्हणून जोरदार तयारी केली.
सरपंचपदासाठी मतदान झाले त्यामधे दाभाडे यांना सहा तर नीलम वरे यांना पाच मते मिळाली. तर उपसरपंचपदासाठी विकास वरे यांना सहा तर विरोधी युवराज गावशेते यांना पाच मते मिळाल्याने दाभाडे व वरे यांची सरपंच उपसरपंचपदी निवड झाली आहे.
सरपंच राजेंद्र दाभाडे म्हणाले की, राज्यांचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्या माध्यमामधून गावातील रस्ते पाणी, आरोग्य शिक्षण हे प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
गावातील जनतेने बिनविरोध सदस्य म्हणून निवडून दिले असून पुन्हा सरपंच केल्याने जबाबदारी वाढली आहे. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईन. माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते सरपंच राजेंद्र दाभाडे व उपसरपंच विकास वरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळेस घोडगगाचे संचालक राजेंद्र गावडे, माजी सरपंच दामु दाभाडे, नानाभाऊ गावशेते, दीपक बोरहाडे, तुकाराम नरवडे, तुषार सांडभोर, आशु भंडलकर, शरद बोंबे, गोपाळ दाभाडे, दिलीप बोंबे, शेखर बोहाडे, संदीप वरे, अनिल वरे, संगीता बोरहाडे, सविता बो-हाडे, सीमा पोखरकर, शरद बरडे, प्रफुल्ल बोंबे, संतोष पोखरकर सदस्य उपस्थित होते.
पिंपरखेड गावच्या सरपंच राजेंद्र दाभाडे व उपसरपंच विकास वरे यांचा सत्कार करताना माजी आमदार पोपटराव गावडे.