अखेर प्रतीक्षा संपली ! 'पीएमपी' ला मिळाला पूर्णवेळ अध्यक्ष, राजेंद्र जगताप यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 02:46 PM2020-07-24T14:46:45+5:302020-07-24T14:50:24+5:30

पीएमपी ला पूर्णवेळ अध्यक्ष कधी मिळणार, याची प्रतिक्षा होती. अखेर ती शुक्रवारी पूर्ण केली.

Rajendra Jagtap new head of PMPL | अखेर प्रतीक्षा संपली ! 'पीएमपी' ला मिळाला पूर्णवेळ अध्यक्ष, राजेंद्र जगताप यांची नियुक्ती

अखेर प्रतीक्षा संपली ! 'पीएमपी' ला मिळाला पूर्णवेळ अध्यक्ष, राजेंद्र जगताप यांची नियुक्ती

Next

पुणे : मागील काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले स्मार्ट सिटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्याकडे अखेर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यशदाच्या उपमहासंचालक नयना गुंडे यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून पीएमपीचा अतिरिक्त पदभार होता. 
नयना गुंडे या पीएमपीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. आर. एन. जोशी यांच्यानंतर त्यांच सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिल्या आहेत. जानेवारी महिन्यात त्यांची आदिवासी कल्याण विभाग बदली करण्यात आली. परंतु डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पीएमपीचा पदभार न स्वीकारल्याने गुंडे यांनी पीएमपीतच थांबावे लागले. त्यानंतर पुन्हा १२ मार्च रोजी त्यांची यशदामध्ये उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यावेळी पीएमपीचा भार कोणावरही सोपविण्यात आला नाही. त्यावेळीही गुंडे यांच्याकडेच पीएमपीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे पीएमपीला पुर्णवेळ अध्यक्ष कधी मिळणार, याची प्रतिक्षा होती. अखेर राज्य शासनाने जगताप यांची नियुक्ती केली.
जगताप हे २०१२ पासून राज्य शासन सेवेत प्रतिनियुक्तीवर आले आहेत. ते भारतीय संरक्षण संपदा सेवा विभागातील अधिकारी आहेत. त्यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. स्मार्ट सिटीतून त्यांची बदली झाल्यानंतर ते सुमारे आठ महिने नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. स्मार्ट सिटीमध्ये असताना पीएमपीच्या काही योजनांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना पीएमपीच्या कामकाजाची माहिती आहे. 
 

Web Title: Rajendra Jagtap new head of PMPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.