राजगड कारखान्याने एफआरपीची थकीत रक्कम द्यावी
By admin | Published: January 21, 2016 01:08 AM2016-01-21T01:08:29+5:302016-01-21T01:08:29+5:30
राजगड सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांची मागील वर्षाची एफआरपीची सुमारे ८ कोटी रु. थकीत रक्कम दिली नाही
भोर : राजगड सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांची मागील वर्षाची एफआरपीची सुमारे ८ कोटी रु.
थकीत रक्कम दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारपासून कारखान्यावर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत पैसे दिले नाही, तर कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशारा भोर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष भालचंद्र जगताप व शिवाजी कोंडे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. या वेळी विक्रम खुटवड, रणजित शिवतरे, आबा यादव, प्रताप शिळीमकर, मानसिंग धुमाळ, संतोष घोरपडे, सुनील भेलके, संदीप नांगरे, नितीन धारणे, सिद्धार्थ टापरे, स्वाती कुंभार, हसिना शेख, जगन्नाथ पारठे, रघुनाथ पारठे उपस्थित होते.जिल्हा बँकेने कारखान्याने वाहतूक संस्थेचे सुमारे १२ कोटींचे व्याज माफ केले, तरीही बँकेचे कर्ज फेडले नसल्याने बँक कर्ज देत नाही. मात्र, कारखान्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने ओरड केली जाते. एफआरपीची रक्कम दिली नाही. त्यामुळे (दि. २२)रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.