राजगड ते तोरणा' रोप वे ’ चा विशेष मार्ग सुरु करावा : मनविसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 08:37 PM2020-01-20T20:37:48+5:302020-01-20T20:38:35+5:30
गडावरील सोयी सुविधांबाबत शासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही...
चंदननगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही होती. राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. राजगड किल्ला पाहण्यासाठी शिवप्रेमींची तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, शासनाकडून शिवप्रेमींसाठी गडावर कोणतीही व्यवस्था होताना दिसत नाही. या राजगडावर अल्पोपहार (झुणका भाकर) तसेच प्राथमिक उपचारासाठी आरोग्य केंद्राची सोयसुध्दा नाही. गडावरील सोय-सुविधाबाबत शासन मात्र म्हणावे एवढे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही.
राजगड ते तोरणा किल्लाचे अंतर पाहता शासनाने निधी उपलब्ध करत रोप वे मार्गाची विशेष व्यवस्था केली तर गड -किल्ले अभ्यासक विद्यार्थी ,शिवप्रेमींची तसेच पर्यटकांची विशेष व्यवस्था होऊ शकेल.
शासनाने त्वरित 'राजगड' किल्ल्यावर गड चढणारे विद्यार्थी ,शिवप्रेमी,पर्यटकांसाठी गडावर विशेष व्यवस्था करत प्राथमिक उपचारसाठी आरोग्यकेंद्र तसेच अल्पोपहार केंद्राची व्यवस्था करावी. तसेच राजगड ते तोरणा रोप वे मार्गासाठी निधी उभारत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकत शासनाने रोप वे मार्गाची विशेष व्यवस्था करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन येरवडा येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयात सहाय्यक संचालक यांच्याकडे केली.यावेळी कल्पेश यादव, विक्रांत अमराळे अमोल शिंदे,कुलदिप घोडके,राहुल प्रताप,सोहित बनकर ,महेश राजगुरु,सागर खांदवे,निखील निंबाळकर ,आशिष म्हसाडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदवी स्वराजाची ग्वाही देणारा 'राजगडावर' शिवप्रेमीसाठी आरोग्य केंद्र व अल्पोपहार केंद तसेच 'राजगड ते तोरणा' रोप वे चा विशेष मार्ग करण्यासाठी विशेष आराखडा तयार करा- कल्पेश यादव , पुणे शहर अध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.