राजगुरुनगर बसस्थानक बनले वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:20+5:302020-12-22T04:11:20+5:30

राजगुरूनगर: पुणे -नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथील बसस्थानकास आगार प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे खासगी वाहनांनी विळखा घातला आहे. या वाहनांनमुळे एसटी बस ...

Rajgurunagar bus stand became a parking lot | राजगुरुनगर बसस्थानक बनले वाहनतळ

राजगुरुनगर बसस्थानक बनले वाहनतळ

googlenewsNext

राजगुरूनगर: पुणे -नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथील बसस्थानकास आगार प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे खासगी वाहनांनी विळखा घातला आहे. या वाहनांनमुळे एसटी बस व रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. आगारप्रमुख कोणतीच कारवाई करत नसल्याने हे बसस्थानक वाहनतळ बनले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी प्रवशांतून होत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातील हे सर्वात मोठे बस स्थानक आगार आहे या आगारातून रोज शेकडो एसटी बसेच ची ये जा सुरु असते. तसेच शाळा व महाविदयालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची गर्दी बसस्थानकांत होत आहे. लग्नतिथी, सुट्टीचे दिवस, असल्यामुळे प्रवाशांची गर्दीही होत आहे. रोज हजारो प्रवाशांची येथून ये..जा असते. मात्र या स्थानक आवारात अवैधरित्या खासगी वाहने उभी केल्याने एसटी बसेसना ये- जा करताना अडथळा निर्माण होतो. या बस स्थानकात येण्यासाठी दोन गेट आहेत एक जाण्याचा मार्ग व एक येण्याचा मार्ग मात्र स्थानक आवारात खाजगी गाड्या तसेच मोटार सायकली लावलेले असतात त्यामुळे प्रवाशांना विनाकारण अडचण निर्माण होत आहे. एस. टी. महामंडळाच्या बसेसना बसस्थानकात जागा नसल्याने स्थानक परिसरात दाटीवाटीने बस उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत.त्यातच खासगी वाहनधारक नियमांची पायमल्ली करताना दिसून येते आहे. वाहतूकीस अडथळे होत असल्याने प्रवाशांना बस जिथे लागते त्या रस्त्यावरच उभे राहावे लागते.परिणामी अपघात होवून जिवीत हाणी होण्याची शक्यता आहे.

बसस्थानकातून अवैध प्रवासी वाहतूक

बसस्थानकात वाहनतळ झाले आहे. पण त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतूकीचे ठिकाणही बनू लागले आहे. अनेक खासगी वाहन चालक बस स्थानकाच्या कंट्रोल रूम येऊन थांबतात प्रवाशांना विचारुन खासगी वाहनांने मुंबई, पनवेल, घाटकोपर येथे घेऊन जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे एसटी मंडळाला आर्थिक तोटा होत आहे. मात्र याकडे स्थानक प्रमुखांचे दुर्लक्ष झाले आहे. पुणे, मंचर, नारायणगाव, संगमनेर, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना नक्की बस कुठे लागते हे लवकर कळत नाही.

.................................................................

आम्ही स्थानक आवारात प्रवाशी व बस यांना अडथळा होईल अशा अवैधरित्या उभ्या राहणाऱ्या वाहनावरती कारवाई करतो. मात्र वाहनचालक सांगतात मी स्थानक आवारात माझ्या नातेवाईकास सोडण्यासाठी व नेण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन आलो आहे. अशी उत्तरे मिळतात. यापुढे स्थानक आवारात नो पार्किंग असे बोर्ड लावून अवैधरित्या उभ्या केलेल्या खासगी वाहनांवरती कारवाई करण्यात येणार आहे.

रमेश हांडे (आगारप्रमुख, राजगुरूनगर एसटी डेपो )

२१ राजगुरुनगर

राजगुरुनगर बसस्थानक आवारात अवैधरित्या उभी केलेली खासगी वाहने

Web Title: Rajgurunagar bus stand became a parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.