राजगुरुनगरला महामार्ग केला मोकळा, प्रांताधिका-यांची धडाकेबाज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:41 AM2017-10-27T01:41:11+5:302017-10-27T01:41:18+5:30

राजगुरुनगर : पुणे-नाशिक या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी (दि.२६) धडक कारवाई करण्यात आली.

The Rajgurunagar highway has been set up, the crackdown on the principals | राजगुरुनगरला महामार्ग केला मोकळा, प्रांताधिका-यांची धडाकेबाज कारवाई

राजगुरुनगरला महामार्ग केला मोकळा, प्रांताधिका-यांची धडाकेबाज कारवाई

Next

राजगुरुनगर : पुणे-नाशिक या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी (दि.२६) धडक कारवाई करण्यात आली. नगर परिषद, महसूल व पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबवून अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
राजगुरुनगर शहरात पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले होते. यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक, प्रवाशी करीत होते. अतिक्रमणे, अरुंद पूल यामुळे नेहमीच वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे राजगुरुनगरमधून प्रवास म्हणजे नको रे बाबा! अशीच भावना झाली होती.
गुरुवारी सकाळी सहापासूनच प्रशासनाने उपविभागीय अधिकारी तथा प्रांत आयुष प्रसाद यांच्या नेत्तृत्वाखाली धडक मोहीम राबविण्यात आली. महामार्गावरील खेड पोलीस स्टेशन ते थिगळस्थळपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढून टाकले. तसेच पाबळ चौकातील अतिक्रमणेहीहटवविण्यात आली. यामध्ये पत्राचे शेड, दुकानांचे लावलेले जाहिरातींचे फलक, हातगाड्या, पानटपºया, वडापावच्या हातगाड्या जेसीबी यंत्राद्वारे काढून टाकल्या. ही कारवाई नगर परिषदेच्या आदेशान्वये केली. अतिक्रमण करणाºयांना दोन दिवसांपूर्वीच नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच गावात भोंगारिक्षा फिरवून दवंडीही देण्यात आली होती. स्वत: अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले होते. अतिक्रमणांमुळे बसस्थानकाहून महामार्गावर येत असताना डावीकडून येणारे वाहन दिसत नव्हते. त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. या कारवाईमुळे एसटी बसस्थानकात लगत असलेले हुतात्मा राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे लांबून दिसू लागले आहेत. पाबळ चौकातील एसटी बसस्थानकांची सुरक्षा भिंतही दिसू लागली आहे. हा रस्ता आता कुठे मोकळा श्वास घेत आहे. चहाटपरी, पानटपरी, वडापाव, फळविक्रते या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे.
आज सकाळपासूनच ३० ते ३५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दिवसभर कारवाई सुरू होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, तहसीलदार सुनील जोशी, नायब तहसीलदार राजेश कानसकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता भास्कर क्षीरसागर यांच्यासह या कारवाईत ६ वरिष्ठ अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी, दोन दंगाकाबू पथके, नगर परिषद कर्मचारी सहभागी झाले होते.
उदरनिवार्हाचा प्रश्न, पर्यायी व्यवस्था करा
प्रशासनाने तर अतिक्रमणे हटवली. त्यामुळे शहरातील शेकडो कुटुंबांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामार्गावरील रस्त्यावर विक्री करणारे फळविक्रे ते, पानविक्रेते, चप्पल-बुट विक्रेते, चहाविक्रेते, वडापावविक्रेते आणि इतर अनेक छोटे-छोटे व्यवसायीक रस्त्यावर आले आहे. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढले असले तरी अतिक्रमणधारकांना नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रीया विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. १५ दिवसांपूर्वी आयुष प्रसाद यांनी खेड विभाग येथे उपविभागीय पदावर रुजू झाले आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी कामाचा धडाका सुरू केला असल्यामुळे तालुक्याला एक तरुण,खमका, निर्भीड, ‘सिंघम’ अधिकारी मिळाला असल्यामुळे राजगुरुनगर शहरातील नागरिक आयुष प्रसाद यांचे कौतुक करीत आहेत.
पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व अतिक्रमण काढून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक
टाकून काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात येणार आहे. रस्ता प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून वाहतूककोंडी होणार नाही, महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांना, पादचारी तसेच शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. उद्या (दि.२७) वाडा रोडवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. - आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी
तथा प्रांताधिकारी, खेड विभाग

Web Title: The Rajgurunagar highway has been set up, the crackdown on the principals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.