राजगुरुनगर-मुंबई सायकलस्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:41+5:302021-08-21T04:13:41+5:30
सायकल राईड ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेले हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. लायन्स क्लब राजगुरुनगर यांनी ...
सायकल राईड ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेले हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. लायन्स क्लब राजगुरुनगर यांनी या सायकलराईडसाठी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. राजगुरुनगर चाकण, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खोपोली पनवेल, वाशी, चेंबूर, यामार्गे गेटवे ऑफ इंडिया सुमारे १६० किलोमीटर अंतर याठिकाणी जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा यावर मात करत पॉल्युशन फ्री इंडिया हा नारा देत यशस्वीरित्या पोहोचली. अजित गायकवाड, कुणाल रावल, श्रीकांत गोरडे, लक्ष्मण नलावडे, सुनील धुमाळ, तुषार महाले आकाश खोंड, अतुल हिंगे, दीपक हिंगे, दीपक कोराळे, महादेव, निखिल लोहकरे तसेच डॉ. भूषण साळी हे सहभागी झाले होते. त्यांना मुंबईमध्ये लक्ष्मण नवले व अभिजित गुंजाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच राईड पूर्ण झाल्यानंतर शिवजन्मभूमी सायकलवारी परिवाराचे धनंजय माताडे, सुनील इचके व अभिजित शेटे यांनी अभिनंदन केले.
२० राजगुरुनगर रॅली