राजगुरुनगर नगरपरिषद भाजपाकडे

By Admin | Published: April 21, 2017 06:01 AM2017-04-21T06:01:12+5:302017-04-21T06:01:12+5:30

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या मदतीने अपक्षांनी राजगुरुनगर नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या हातात घेतल्या होत्या; मात्र अपक्षांना गळाला लावत अखेर भाजपाने

Rajgurunagar Municipal Council to BJP | राजगुरुनगर नगरपरिषद भाजपाकडे

राजगुरुनगर नगरपरिषद भाजपाकडे

googlenewsNext

दावडी : दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या मदतीने अपक्षांनी राजगुरुनगर नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या हातात घेतल्या होत्या; मात्र अपक्षांना गळाला लावत अखेर भाजपाने नगर परिषद आपल्या ताब्यात घेतली आहे. गुरुवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे संदीप सांडभोर हे बहुमताने निवडून आले. अपक्ष नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनीही दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करीत आपली खुर्ची वाचवली आहे.
शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी ही निवडणूक झाली.
दोन वर्षांपूर्वी राजगुरुनगर नगर परिषदेची निवडणूक झाली. यात अपक्षांनी सर्वाधिक १० जागा मिळविल्या. दुसऱ्या क्रमांकावर भाजपा राहून त्यांनी सात, तर शिवसेनेला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, एक अपक्ष फुटून भाजपाच्या गळाला लागल्याने त्यांचे संख्याबळ आठ झाले. त्यामुळे अपक्षांनी शिवसेनला उपनगराध्यक्षपद देत दोन सदस्यांच्या मतदतीने नगर परिषद ताब्यात घेतली.
उपनगराध्यक्षपद हे सव्वा वर्षासाठी ठरले होते. त्यानुसार शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर यांनी राजीनामा दिला आणि येथील राजकारण फिरले.
भाजपाने टाकलेल्या गळाला अपक्ष लागले. ९ अपक्षांपैैकी दोन वगळता सात जणांनी भाजपात प्रवेश केला. यात अपक्ष संदीप सांडभोर यांचाही समावेश होता.
गुरुवारी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप सांडभोर व शिवसेनेचे शंकर राक्षे यांनी उमेदवारी अर्ज भरले. निवडणूक मतदान प्रक्रिया हात वर करून घेण्यात आली. यात भाजपाचे संदीप सांडभोर यांना १४ मते, तर शिवसेनेचे शंकर राक्षे यांना शिवसेनेची दोन उरलेल्या अपक्षांची दोन अशी ४ मते पडली.

Web Title: Rajgurunagar Municipal Council to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.