राजगुरूनगर ते साकुर्डी एसटी बससेवा सुरू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:45+5:302021-02-07T04:10:45+5:30

राजगुरूनगर -- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली राजगुरूनगर ते साकुर्डी एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी मागणी ...

Rajgurunagar to Sakurdi ST bus service should be started | राजगुरूनगर ते साकुर्डी एसटी बससेवा सुरू करावी

राजगुरूनगर ते साकुर्डी एसटी बससेवा सुरू करावी

googlenewsNext

राजगुरूनगर

--

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली राजगुरूनगर ते साकुर्डी एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी मागणी कोयाळी तर्फे वाडा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे राजगुरूनगर एसटी आगाराकडे केली आहे.

त्यासाठी कोयाळी तर्फे वाडा ग्रामपंचायतीच्यावतीने राजगुरूनगर एसटी आगाराचे वाहतूक निरीक्षक तुकाराम पवळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिव सहकार सेनेचे जिल्हा संघटक शंकर दाते, उपसरपंच ॲड. संतोष दाते, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष एल. बी. तनपुरे, विकास सोसायटीचे अध्यक्ष संजय वाढाणे, पोलीस पाटील अनिल दाते, काळूराम दाते ,निखिल दाते,सीताराम दाते व ग्रामस्थ उपस्थित होते. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात कहू, कोयाळी व साकुर्डी ही गावे आहेत. या भागातील नागरिकांची दळणवळण सुविधा प्रामुख्याने एसटी बसवरच अवलंबून असते. लॉकडाऊनमुळे या भागातील एसटी सेवा बंद करण्यात आल्याने या परिसरातील शेतकरी, किरकोळ विक्रेते व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. चाकण - भोसरी परिसरातील कंपन्या व कारखाने, शाळा - विद्यालये सुरू झाली आहेत. राजगुरूनगर - चाकण भागात नोकरीसाठी जाणारे नोकरदार व ग्रामस्थांचे एसटी चालू झाली नसल्याने हाल होत आहेत. या भागातील अनेक नागरिक उदरनिर्वाहासाठी राजगुरूनगर व चाकण परिसरात एसटीने ये - जा करत असतात. परंतु एसटी बंद असल्याने कामावर जाता येत नाही.

Web Title: Rajgurunagar to Sakurdi ST bus service should be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.