राजगुरुनगरकरांची शौैचालयाच्या दुर्गंधीतून होणार मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:15 AM2018-02-09T01:15:22+5:302018-02-09T01:15:31+5:30
राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
राजगुरुनगर : राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वीजबचत तसेच पाणीबचतही होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.
राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर प्रांत कार्यालय, खेड पंचायत समिती चौक, दिलावर खान दर्गा, गढई मैदान बाजार, नगर परिषद बाजारतळ, स्मशानभूमी, पाबळ रोड, तिन्हेवाडी रोड, मासे बाजार आदी ठिकाणी ‘दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे’ ठेवण्यात येणार आहेत.
राजगुरुनगरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे. गावाची लोकसंख्या आणि आकारमान तर वाढलेच; त्याचबरोबर दळणवळणही खूप वाढले आहे. त्याप्रमाणात स्वच्छतागृहांची संख्या वाढली नाहीच. उलट, आधी काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे लोकांनी पाडून टाकली आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतागृहे नाहीत. जी काही उरली आहेत तेथे लोकांनी नळ तोडून, भांडी तोडून, दगडगोटे टाकून त्यांची दुरवस्था केली आहे. त्यामुळे तिथे खूप दुर्गंधी असते. या परिस्थितीमुळे लोकांची फार अडचण होते.
राजगुरुनगर शहरातील ही समस्या ओळखून नगर परिषदेने पुढाकार घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुण्यातील एका कंपनीने बनविलेली अत्याधुनिक स्वच्छतागृहे ठिकठिकाणी बसविण्याचा विचार नगरसेवकांपुढे ठेवला. सर्वांनी त्याला मान्यता दिली.
>स्वच्छतागृहाच्या संचावर सौरपत्रे बसविण्यात आल्याने स्वतंत्र वीजचे गरज नाही
मुतारीची भांडी नवीन ‘जेलयुक्त’ तंत्रज्ञान वापरून बनविली आहेत. त्यामुळे पाणी वापरण्याची गरज राहत नाही, तसेच दुर्गंधी राहत नाही. हे विशिष्ट ‘जेल’ तीन-चार महिन्यांनी पुन्हा भरता येते.
या स्वच्छतागृहाच्या भिंती उष्णतारोधक पदार्थाने बनविलेल्या असल्यामुळे पत्रा किंवा ‘फायबर’ भिंतींसारख्या असल्याने तापत नाहीत. शिवाय, या भिंती मजबूत असल्याने सहजासहजी तोडता येत नाहीत.
या स्वच्छतागृहाच्या संचावर सौरपत्रे बसविण्यात आले आहेत; त्यामुळे त्या संचाला विजेची गरज नाही. शौचालयात स्टीलची भांडी वापरण्यात आल्याने ती सुलभतेने स्वच्छ करता येतात.
या संचांमध्ये मुळातच पाईपला जोडलेले नळ बसविण्यात आल्याने ते चोरट्यांना खोलून
नेता येत नाहीत. संचाचा
तळ अल्युमिनियमचा, तसेच आतील बाजू मार्बलसारख्या डिझाईनची आहे.