विजयस्तंभ परिसरात भव्य स्मारक उभारणार - राजकुमार बडोले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:43 AM2018-12-29T00:43:41+5:302018-12-29T00:43:46+5:30
कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजय रणस्तंभ परिसरात आंबेडकरी कार्यकर्ते, पक्ष, संघटनांच्या सूचना लक्षात घेऊन भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
लोणीकंद/कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजय रणस्तंभ परिसरात आंबेडकरी कार्यकर्ते, पक्ष, संघटनांच्या सूचना लक्षात घेऊन भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. बाबासाहेबांनी या देशात जो समेतचा नारा दिला, त्यानुसार आपण सर्व जाती, पंथ, भेद विसरून विजयस्तंभाला मानवंदना द्यावी. त्या काळात जे शौर्य दाखविले, त्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतानाच मानवंदना देण्याकरिता येणाऱ्या बांधवांची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
पेरणे (ता. हवेली) येथे १ जानेवारीच्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून येणाºया समाजबांधवांसाठी व गतवर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील, बार्टी संस्थेचे आयुक्त कैलास कणसे, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार सुनील कोळी, प्रशांत उबाळे, विशाल सोनवणे, पांडुरंग गायकवाड आदी उपस्थित होते. पेरणे येथील विजयस्तंभाची पाहणी करताना राजकुमार बडोले यांनी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली. या वेळी ते म्हणाले, की सोहळ्याबाबत पुण्यातही बैठक घेण्यात आली आहे.
पालकमंत्री गिरीश बापट हे सतत प्रशासनाची बैठक घेत असून जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील विशेष काळजी घेत आहेत. बाबासाहेबांच्या काळापासून विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमसैनिक देशभरातून येतात. मानवंदना देण्यासाठी येणाºया समाजबांधवांची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे.
स्थानिक करणार स्वागत
१ जानेवारी रोजी मानवंदनेला येणाºया बांधवांचे स्वागत परिसरातील स्थानिक नागरिक फुले व पाणी, खाद्यपदार्थ देऊन करणार असल्याने सामाजिक एकतेचा संदेश देशभरात दिला जाईल, असे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.