मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी प्रयत्नशील - राजमाता शुभांगिनीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:54 AM2017-12-25T03:54:56+5:302017-12-25T03:54:59+5:30
डोद्याचे साहित्य संमेलन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणारे ठरेल, असा विश्वास संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे यांनी शनिवारी येथे बोलून दाखविला.
पुणे : बडोद्याचे साहित्य संमेलन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणारे ठरेल, असा विश्वास संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे यांनी शनिवारी येथे बोलून दाखविला.
बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. बडोदा संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, कार्यवाह वनिता ठाकूर,आदी यावेळी उपस्थित होते.
संमेलनासाठी नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. मात्र संमेलनात राजकारण आणणार नाही. अशी स्पष्टोक्त्ती रामजामातांनी दिली. सयाजीराव गायकवाड यांचे १२५ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले आहेत, त्यापुढील २० ते २५ खंडांचे प्रकाशन बडोद्याच्या साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे, याचा विशेष आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. पाटील यांनी संमेलनाला २५ लाख रूपये दिल्याचे जाहिर केले़