निर्मनुष्य रस्त्यांमुळे ' राजू' झालाय अस्वस्थ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 02:44 PM2020-04-22T14:44:30+5:302020-04-22T14:45:14+5:30
ट्रॅफिक पोलिसांचे काम हलके व्हावे म्हणून चपळ गतीने धावपळ करणारा ' राजू ' सर्वांनीच कधीतरी पाहिला असेल!
पुणे : रोज त्याला माणसे पाहायची सवय. सख्ख असं त्याचं कुणीच नाही..पण कुणीतरी समोर आहे हाच काय तो आधार..मात्र आज कुणीच पाहायला मिळत नाही..कुणी तरी अन्न आणून देतं पण त्याची चव त्याला गोड लागत नाही...कारण आसपास कुणीच नाही...म्हणून तो आज काहीसा अस्वस्थ झालाय...फारस कुणाशी बोलत नाही...हे निर्मनुष्य रस्ते पाहून त्याचं जीवन ही काहीसं थांबलय....ही कहाणी आहे मनावर आघात झालेल्या ' राजू' ची!
शहरातील गर्दीच्या ठिकाणी ,ट्रॅफिक जाम असलेल्या चौकात मध्यभागी लोकांना हातवारे करणारा,हाती काठी, डोक्यावर टोपी अन अधूनमधून शिट्टी वाजवत उभा असलेला , ट्रॅफिक पोलिसांचे काम हलके व्हावे म्हणून रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चपळ गतीने धावपळ करणारा ' राजू ' सर्वांनीच कधीतरी पाहिला असेल! कधी मगरपट्ट्याचा उड्डाणपूल तर कधी विमाननगर चौक...एक ठिकाणी त्याच वास्तव्य नाही...साहेब असा आवाज दिला कि गडी खुश होणार. सुशिक्षित अन शहाण्यांच्या जगाला नियम शिकवणारा तो तुमच्या नजरेत वेडा असला तरी त्याला जे समजते ते तुम्हाला कधीच समजत नाही. एरवी गदीर्ची सवय झालेला हा राजू सध्या निर्मनुष्य रस्ते अन सामसूम शहर पाहून पार बिथरलायङ्घ..त्याची ही करूण कहाणी प्रबोधन संस्थेच्या सचिन पाटील यांनी ' लोकमत' शी बोलताना उलगडली. शहरातील पूल अथवा सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्या अंध, अपंग, बेघर यांना जेवणाचे डबे देण्याचे काम प्रबोधन संस्था करीत आहे.
ते म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून महिनाभरात यामधील बऱ्याच व्यक्तींशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. मूड ठीक असेल तर ही मंडळी बोलतात नाहीतर आपल्या बोलण्याकडे त्यांचे लक्षही नसते. राजू हा त्यातलाच एक आहे. असाच एक विविध चौकात फिरणारा , मानसिक आघात झालेला , पण शहाण्यांच्या जगाला तो शिस्त लावू पाहत असतो , पण आज तो थबकलाय. अलीकडे तो फारसा बोलत नसायचा , कधी डबा खायचा तरी कधी तसाच पडून असे ,पण अचानक कधीतरी त्याचा मूड फिरतो ,कडक सलाम ठोकून तो शिट्टी मारतो ....वाहतुकीचे नियम मोडणारी , रस्त्यावर कचरा फेकणारी अन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी माणसे पाहिली की मला अश्याना शिस्त लावणारा राजू अधिक शहाणा वाटू लागतो , राजू बनून चांगले काम करणे चांगलेच आहे की! दोन घासानंतर त्याच्या डोळ्यात एक आत्मिक समाधान दिसते , सेल्फी अन डबे मोजणाऱ्या ना ते कसे दिसणार? ....असा मनाला चटका लावणाऱ्या पाटील यांच्या प्रश्नाने अस्वस्थ केले.