जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:05 PM2021-10-22T16:05:15+5:302021-10-22T16:11:33+5:30

जयसिंगपूर इथे झालेल्या ऊस परिषदेतील ठराव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले अशी माहिती शेट्टी यांनी दिली. एफआरपी एकरकमीच हवी. डिसेंबरमध्ये ३१००रूपये द्यावे. ऊर्वरित रक्कम जानेवारीत द्यावी. साखरेचे भाव आता केंद्र सरकारने वाढवावेत. किमान ३७ रूपये असा भाव करावा अशी मागणी शेट्टी यांनी केली

raju shetti farmer frp bjp ajit pawar jarandeshwar sugar factory | जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण- राजू शेट्टी

जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण- राजू शेट्टी

googlenewsNext

पुणे: माझे धोरण आडवा येईल त्याला तुडवणार असे आहे, भाजपावर खूश बाकीच्यांवर नाराज असे काही नाही. सध्या सोयीचे असेल तेवढे काढायचे व बाकीचे झाकायचे अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (raju shetti) यांनी आपली भूमिका जाहीर केली. साखर आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी म्हणून शेट्टी शुक्रवारी दुपारी आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, फक्त जरंडेश्वरच नाही अनेक कारखाने आहेत. सगळे सारखेच आहेत, पण सोयीचे तेवढे काढायचे बाकीच्या झाकायचेअसा प्रकार सुरू आहे.

आपण सुरूवातीपासूनच या व्यवहारांबाबत ओरडत होतो असे स्पष्ट करून शेट्टी म्हणाले, फक्त जरंडेश्वरच टार्गेट का याचे ऊत्तर आरोप करणार्या किरीट सोमय्या यांनी द्यावे. गैरव्यवहार झालेल्या कारखान्यांची यादी मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत. मी महाविकास आघाडीवर नाराज अन् भाजपा सरकारवर खुश अस काही नाही. माझी वाटचाल अशीच असणार, जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण आहे.

जयसिंगपूर इथे झालेल्या ऊस परिषदेतील ठराव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले अशी माहिती शेट्टी यांनी दिली. एफआरपी एकरकमीच हवी. डिसेंबरमध्ये ३१००रूपये द्यावे. ऊर्वरित रक्कम जानेवारीत द्यावी. साखरेचे भाव आता केंद्र सरकारने वाढवावेत. किमान ३७ रूपये असा भाव करावा अशी मागणी शेट्टी यांनी केली. राज्य सरकार घोषणा करते तसे वागत नासी. राज्यात ९ लाख उसतोडणी कामगार आहेत. त्यांच्यासाठी जाहीर केलेले गोपीनाथ मंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळ यंदा तरी सुरू करावे असे ते म्हणाले.

Web Title: raju shetti farmer frp bjp ajit pawar jarandeshwar sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.