धैर्यशील मानेंना लोक धडा शिकवतील, मी लोकसभा लढवणार आणि जिंकणारही- राजू शेट्टी

By राजू इनामदार | Published: July 29, 2022 05:49 PM2022-07-29T17:49:04+5:302022-07-29T17:51:21+5:30

मी लोकसभा लढवणार आणि जि़ंकणारही...

raju shetti will contest loksabha election 2024 People will teach a lesson to dhairyashil mane | धैर्यशील मानेंना लोक धडा शिकवतील, मी लोकसभा लढवणार आणि जिंकणारही- राजू शेट्टी

धैर्यशील मानेंना लोक धडा शिकवतील, मी लोकसभा लढवणार आणि जिंकणारही- राजू शेट्टी

googlenewsNext

पुणे: मतदारांचा विश्वासघात करून शिंदे गटात गेलेल्या धैर्यशील माने (dhairyashil mane) यांना मतदार धडा शिकवतील. मी त्यांच्या विरोधात लोकसभा लढवणार आणि जि़ंकणारही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांंनी दिला. मी ना भाजपाचा ना महाविकास आघाडीचा, मी स्वतंत्र आहे असे ते म्हणाले. ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेट्टी यांनी शुक्रवारी दुपारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.

पत्रकारा़ंबरोबर बोलताना शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, खरीप हंगामाच्या आधी कृषी मंत्र्यांंनी जबाबदारीने काम करायला हवे. पण आपले कृषी मंत्री हवापालट करायला गुवाहाटीला गेले आणि आता तर महिना झाला राज्याला कृषीमंत्रीच नाही. २३ जिल्ह्यांतील ८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले मात्र त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. सध्या राज्यात दोनच मंत्र्यांचे सरकार काम करत आहे. राज्यभरात बोगस बियाणांचा सुळसुळाट झालाय. रासायनिक खतांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली. पण या समस्या सोडवण्याऐवजी राज्यात मोठं राजकारण सुरू आहे. 

कारखान्यांना आलेले च़ांगले दिवस शेतकऱ्यांनाही यावेत अशी अपेक्षा व्यक्त करून शेट्टी म्हणाले, १ हजार ५३६ कोटी रूपया़ंची एफआरपी थकीत आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन हप्त्यात एफआरपी द्यावा असा कायदा मंजूर करून घेतला. पण दोन हप्त्यातही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. आता ही थकबाकी व्याजासह शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

कारखाने शेतकऱ्यांचा ऊस वजनात मारतात. गाडीमागे २ टन वजन कमी दाखवले जाते. यावर उपाय म्हणून ऑइल कंपन्यांनी पेट्रोल पंपांसाठी जशी एकच संगणक प्रणाली विकसित केली आहे तशीच सर्व कारखान्यांच्या वजनकाट्यासाठी करावी. त्याचा पासवर्ड साखर आयुक्ताकडे ठेवावा. अशी सुचना आयुक्ता़ंना केली व त्यांनी ती मान्य केली असे शेट्टी म्हणाले. प्रकाश बालवडकर, योगेश पांडे, बापू कारंडे, सुरेंद्र पंढरपूरे व संघटनेचे अन्य पदाधिकारी यावेळी शेट्टी यांच्या समवेत होते.

Web Title: raju shetti will contest loksabha election 2024 People will teach a lesson to dhairyashil mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.