दूध संस्थांना अनुदान लाटू देणार नाही- राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:53 AM2018-08-21T01:53:47+5:302018-08-21T01:54:03+5:30
आम्ही लढून दुधाला दरवाढ करून घेतली असून डोक्यावर केसेस घेतल्या आहेत. दूध संघांना मोठे करण्यासाठी नाही,’ असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
मंचर : ‘खासगी दूध संस्थांनी मापात पाप करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही. आम्ही लढून दुधाला दरवाढ करून घेतली असून डोक्यावर केसेस घेतल्या आहेत. दूध संघांना मोठे करण्यासाठी नाही,’ असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
पिंंपळगाव खडकी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यतीवर प्राणीमित्रांनी बंदी आणली आहे. बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून आहे. प्राणीमित्रांना जनावरांचा एवढा पुळका असेल, तर त्यांनी शाकाहारी राहावे. शेतकऱ्यांची शेती तोट्याची आहे. जोडधंदा असलेल्या दुधाच्या धंद्यात अनेक घरे बरबाद झाली. पाण्यापेक्षा दूध स्वस्त कशासाठी? असा सवाल करून शेट्टी म्हणाले, ‘‘दुधाची दरवाढ झाली, याचे श्रेय मला देऊ नका. यापुढे कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, गोरगरीब व वंचित घटकांसाठी लढणार आहे.’’ शेतकºयांच्या प्रश्नासाठी आयुष्य खर्ची घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांगर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या वेळी जयप्रकाश परदेशी, अण्णासाहेब भेगडे, वनाजी बांगर यांची भाषणे झाली. व्यासपीठावर सावकार मादनाईक, सुभाष अडदांंडे, बापूसाहेब कारंडे, सुरेंद्र पंढरपुरे, दिलीप बाणखेले, सचिन पवार, मिलिंद बारवे आदी उपस्थित होते. अनिल चव्हाण यांनी
सूत्रसंचालन केले.