राजू शेट्टी यांना वाराणसीत नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 07:41 PM2019-05-06T19:41:40+5:302019-05-06T19:45:32+5:30

साखर आयुक्त कार्यालयात झालेल्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी, सरकारचे दुष्काळावरील धोरण आणि इतर विषयांवर संवाद साधला. 

Raju Shetty wished to campaign against Narendra Modi in Varanasi | राजू शेट्टी यांना वाराणसीत नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा 

राजू शेट्टी यांना वाराणसीत नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा 

Next

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा असल्याचे मत त्यांनी पुण्यात व्यक्त केले. साखर आयुक्त कार्यालयात झालेल्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी, सरकारचे दुष्काळावरील धोरण आणि इतर विषयांवर संवाद साधला. 

यावेळी त्यांना वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करण्यास जाणार का असा सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, माझी तर जाण्याची इच्छा आहे. मात्र जर यूपीए प्रमुखांनी सांगितल्यास जरूर प्रचार करेन. याशिवाय  येत्या १० तारखेपासून बिहार आणि उत्तरप्रदेशात प्रचारासाठी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 दुष्काळाच्या मुद्दयावर सरकारने केलेल्या कामाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मंत्री जात असताना अनेकदा आधीच बंदोबस्त केला जातो. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतले जाते. मंत्र्यांचे पोलीस बंदोबस्तात दौरे सुरु आहेत त्यावरून लोकांच्या मनात किती मोठा उद्रेक आहे हे लक्षात येत आहे. असा स्थितीत आचारसंहितेचा बाऊ करून दुष्काळग्रस्तांचे  अश्रू पुसण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सक्तीची बँक वसुली, विद्यार्थ्यांची फी मोफत करणे या केवळ शाब्दिक घोषणा ठरल्या आहेत. चारा छावण्यांमध्येही शेतकऱ्यांचे हाल सुरु असून त्या छळ छावण्या आहेत की काय वेळ निर्माण झाली आहे. अशा परिथितीत सरकार काय करत आहे. काय अंमलबजावणी करायची हे सर्वांना माहिती आहे. मात्र केवळ कर्तव्य टाळण्यासाठी आचारसंहितेचा बाऊ केला जात आहे. 

Web Title: Raju Shetty wished to campaign against Narendra Modi in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.