गोवंश हत्याबंदीवर राजू शेट्टी यांची टीका
By admin | Published: October 10, 2015 01:46 AM2015-10-10T01:46:29+5:302015-10-10T01:46:29+5:30
अवर्षणाच्या काळामध्ये बळीराजाला निरुपयोगी भाकड जनावरे सांभाळायला लावणे कितपत योग्य आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी गोवंश हत्याबंदी
पुणे : अवर्षणाच्या काळामध्ये बळीराजाला निरुपयोगी भाकड जनावरे सांभाळायला लावणे कितपत योग्य आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यावर शुक्रवारी पत्रकार परिषदेत टीका केली. दुसऱ्याला परोपकार करण्यास सांगणे सोपे असते, पण स्वत: परोपकार करणे यात खूप फरक असतो. सरकारला जर भाकड जनावरांची इतकी काळजी असेल, तर ती सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याचा घाट साखर कारखान्यांकडून घातला जात आहे. त्याच्या निषेधार्थ १६ आॅक्टोबरला कोल्हापुरला सह साखर संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.