राजवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:48+5:302021-04-11T04:09:48+5:30
लाखेवाडी: नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पाडेगाव ( जि. सातारा ) येथील महात्मा फुले ...
लाखेवाडी: नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पाडेगाव ( जि. सातारा ) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास शुक्रवारी (दि.९) भेट दिली व शास्त्रज्ञांशी संवाद साधला. याभेटीत ऊस पिकावर सुरू असलेल्या विविध संशोधनांची, नवीन वाणांची व आधुनिक पीक पद्धतीची माहिती राजवर्धन पाटील यांनी घेतली.
यावेळी राजवर्धन पाटील यांनी एम.एस. १०००१, को. ८६०३२, फुले २६५, तसेच चाचणी सुरू असलेल्या को. ९०५७, या वाणांच्या ऊस प्रक्षेत्रांना भेटी देऊन पीक लागवडीची माहिती घेतली. इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी शुद्ध गुणवत्तेचे बेणे वापरल्यास उत्पादनात भरीव वाढ होऊन, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल, असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ऊस विशेष तज्ज्ञ डॉ. भरत रासकर, डॉ. सुभाष घोडके, डॉ.रामदास गारकर यांनी राजवर्धन पाटील यांना ऊस पिकांच्या नवीन वाणांची व चालू असलेल्या विविध प्रकारच्या संशोधनांची माहिती दिली. याप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी डी. एम. लिंबोरे, ए.आर.पवार आदी उपस्थित होते.
नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास भेट दिली.
१० बारामती-०६
---------------------------