राज्यवर्धन यांनी साधली संवादसंधी
By admin | Published: May 13, 2017 05:03 AM2017-05-13T05:03:30+5:302017-05-13T05:03:30+5:30
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) चित्रपट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी शुक्रवारी साधली. तसेच, त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) भेट देऊन तेथील कामकाजाची माहितीदेखील घेतली.
अखिल भारतीय विज्ञान संमेलनासाठी राठोड पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी एफटीआयआय आणि एनएफएआय या संस्थांना भेट दिली. एफटीआयआयमध्ये आयोजित चित्रपट रसग्रहण विद्यार्थ्यांशी त्यांनी या वेळी संवाद साधला.
राठोड म्हणाले, ‘‘चित्रपट माध्यमात अनेक जण एक महत्त्वाकांक्षा म्हणून काम करीत असतात. त्यांनी केलेले काम हे सामन्य नसते, तर ते एक उदाहरण म्हणून समोर येत असते. अशा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रपटातील सूक्ष्म भेददेखील लक्षात येतील.’’ त्यानंतर राठोड यांनी या वेळी एफटीआयआयच्या ध्वनी आणि प्रभात या प्रसिद्ध स्टुडिओलादेखील भेट दिली.
राठोड यांनी एनएफएआय संस्थेच्या चित्रपट जतन विभाग आणि ग्रंथालयाला भेट दिली, तसेच तेथील चित्रपट यंत्रणेची व सुरू असलेल्या प्रकल्पांची माहितीदेखील घेतली.