रक्षाबंधनामुळे प्रवाशांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:47 AM2018-08-28T01:47:26+5:302018-08-28T01:48:00+5:30
एसटी बसस्थानकावर गर्दी : तिकीट घेण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा
बारामती : रक्षाबंधन असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची गेल्या दोन दिवसांत संख्या वाढली आहे. एसटी फेºयात ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे बारामती एसटी बसस्थानकावर तिकीट घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास गेटच्या बाहेर रांगा गेल्याचे पहायला मिळाले.
रक्षाबंधन सणानिमित्त बाहेर गावावरून येणारे व बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. खास करून बारामतीवरुन पुण्याकडे जाण्यासाठी एका वेळी ५ गाड्या लावल्या जात होत्या. तरी देखील गर्दीमध्ये वाढ कायम असल्याचे चित्र होते. लालपरी त्याच प्रमाणे शिवशाही गाड्या प्रवाशांनी ओसंडल्या होत्या. रोज साधारण पुणे येथे जाण्यासाठी एसटी बसच्या ५० फेºया होतात. पण रक्षा बंधन असल्याने पुणे - बारामतीच्या ७१ फेºया झाल्या. या मार्गावरून धावणाºया एसटी फेºयात ४० टक्के वाढ झाली. त्याच प्रमाणे ३ ते ४ लाख रुपये जास्त व्यवसाय एसटी महामंडळ झाला, अशी माहिती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली. सोमवारी (दि २७) कामाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. पण सकाळी १० वाजता जाणारी रेल्वे बंद असल्याने दिवस भर स्टॅन्ड वर गर्दी पाहायला मिळत होती. दर वर्षी रक्षाबंधनाला होणारी गर्दीचा अनुभव असल्याने या वेळी २, ३ दिवस आधीच नियोजन केल्याचे गोंजारी यांनी सांगितले. प्रत्येकाला कामे वाटून दिल्याने कोणताही गोंधळ झाला नाही, कामाचा ताण आला नाही. तिकीट खिडकीवर देखील एकाच बाजूने लोक आत जात होते. दुसºया बाजूने बाहेर येत होते. त्यामुळे भांडणे आरडा ओरडा असा प्रकार घडला नाही.
...प्रवाशांच्या निवाºयासाठी शेड उभारण्याची मागणी
४बारामती-पुणे नॉनस्टॉपची तिकीट खरेदी करताना प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागते. ज्येष्ठ नागरिक महिला, लहान मुले, यांना खूप त्रास सहन करावा लागतो. तिकीटखरेदीसाठी पूर्ण उन्हात थांबावे लागते. येथे प्रवाशांच्या निवाºयासाठी शेड उभारण्याची मागणी होत आहे.
४आॅनलाइन तिकीटविक्री असल्याने बरेच लोक आॅनलाइन बुकिंग करून तिकीट घेतात. त्यामुळेदेखील बराच फायदा होतो. त्यांनादेखील वेगळी रांग केली होती.
४मुंबईला जाणारी बस, तर आॅनलाइन बुक झाल्याने त्याच गाडीबरोबर मुंबई साठी एक बस तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. रोज संध्याकाली ५ ते ८ या वेळेत पुण्याला जाण्यासाठी मोठी गर्दी असते. पण त्यासाठी सगळी पूर्व तयारी केली होती.