भैरवनाथ विद्यालयात रक्षाबंधन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:32+5:302021-08-24T04:13:32+5:30

या काळात नाती बेगडी होताना आपण पहातो, परंतु या मतलबी युगात खऱ्या अर्थाने बहीण-भावाचे नाते हे अतुट असून ...

Rakshabandhan celebration at Bhairavnath Vidyalaya | भैरवनाथ विद्यालयात रक्षाबंधन साजरा

भैरवनाथ विद्यालयात रक्षाबंधन साजरा

Next

या काळात नाती बेगडी होताना आपण पहातो, परंतु या मतलबी युगात खऱ्या अर्थाने बहीण-भावाचे नाते हे अतुट असून समाजामध्ये रक्षणाचे, मांगल्याचे व आनंदाचे प्रतीक म्हणून हा पवित्र सण प्राचीन काळापासून आपण साजरा करतो, असे प्रतिपादन शिरूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांनी केले.

विद्यालयातील सर्व मुलांना व शिक्षकांना राख्या बांधण्यात आल्या तसेच माझी शाळा माझी जबाबदारी रोखूया कोरोना महामारी असे म्हणत आम्ही सर्व जण या नात्याचे व कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू, असे मत मुलांनी मांडले

या कार्यक्रमास संभाजी कुटे, गोरक्ष डुबे, सुप्रिया काळभोर, नवनाथ डुबे, सतीश अवचिते, सुहास बिडगर, रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Rakshabandhan celebration at Bhairavnath Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.