रक्षाबंधन सेलिब्रेशन, गडचिरोली पोलिसांना बांधल्या राख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 02:19 AM2018-08-27T02:19:56+5:302018-08-27T02:20:25+5:30
स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. देशातील लोकांच्या संरक्षणासाठी पोलीस दलातील अधिकारी सदैव तत्पर असतात.
पुणे : स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. देशातील लोकांच्या संरक्षणासाठी पोलीस दलातील अधिकारी सदैव तत्पर असतात. आजही गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात भीतीयुक्त वातावरणात आदिवासी लोक, शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय राहत आहेत. त्यांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम करीत पुण्यातील भगिनींनी राख्या आणि कृतज्ञतेचे शुभेच्छापत्र पाठवून रक्षाबंधन साजरे केले आहे.
धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळ, युवा वाद्यपथक व भरारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. स्वारगेट येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात संस्थेतील महिलांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, मंडळाचे अध्यक्ष व
सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, युवा वाद्य पथकाचे अॅड. अनिष पाडेकर, चिन्मय वाघ, भरारी प्रतिष्ठानच्या संध्या बोम्माना, राजश्री जाडे, मुमताज शेख आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस रोज नक्षलवादाविरुद्ध लढत असतात. त्यामध्ये कित्येक पोलीस शहीद होतात. तेथील लोकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, याकरिता त्यांचे संरक्षण करणाºया या पोलीस बांधवांना पुण्यातील संस्थांनी राख्या आणि शुभेच्छापत्रे पाठवत त्यांच्या कार्याला सलाम
केला आहे.
- उदय जगताप