खेड तालुक्यातील राक्षेवाडी 'कंटेन्मेंट' तर राजगुरूनगर शहर 'बफर झोन' म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:41 PM2020-05-16T12:41:32+5:302020-05-16T12:43:31+5:30
राक्षेवाडीत एक कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आली आहे
राजगुरुनगर: राक्षेवाडीत कोरोना बाधित व्यक्ती आढळुन आल्यावर आज पासुन राक्षेवाडीसह लगत असलेले राजगुरूनगर नगरपरिषदचे दोन वार्ड कंटेन्मेंट (संक्रमणशील) तर राजगुरूनगर शहर बफर झोन करण्यात आले. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेला केश कर्तनवाला, कोरोनाग्रस्त रुग्णावर प्राथमिक उपचार करणारे खाजगी डॉक्टर, नर्स यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तसेच कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचे व दोन लहान मुलांचे रिपोर्ट संध्याकाळपर्यत हाती येतील. असे पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले.
राक्षेवाडीत एक कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे. त्यांच्या हाय रिस्क संपर्कात आलेले ११जण असुन त्यांतील ५ जण जहांगीर तर ६ जण औंध रुग्णालयात दाखल केले आहेत.
बाधित व्यक्तीची पत्नी,त्यांची२ व भावाचा एक अशी तीन लहान मुले,भाऊ भावजय, आई,वडील केस कटिंगवाला व डॉक्टर यांचा समावेश होता.याशिवाय पत्नी निमगाव येथील एका कंपनीत नोकरी करते. या कंपनीतील २९ महिलापैकी ५ सहकारी कामगार महिला आणि त्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या २२ फ्लॅट मधील ८७ जणांना त्यांच्या राहत्या घरी होम क्वारंटाइन केले आहे.संबंधित कंपनी गुरुवारी रात्रीपासून पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. रुग्ण आढळुन आल्याने पुणे नासिक महामार्गच्या पूर्वेकडे राक्षेवाडी व नगरपरिषदचे दोन वार्ड हा परिसर बफर झोन करन्यात आला आहे.या भागात नागरिकांना येजा करण्यास मज्जाव करण्यात आला येत आहे. येथे कोणत्याही दुकानांना उघडण्यास मनाई आहे. फक्त होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.या परिसरातील तीन हजार नागरिकांची खेड तालुका आरोग्य व आशा वर्कर यांच्या माध्यमातुन आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी सांगितले. विभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे,तहसीलदार सुचित्रा आमले,पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, राजगुरूनगर नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप व कर्मचारी यांनी बंदोबस्त तैनात केला आहे.