सह्याद्री ऑफ-रोडरच्यावतीने शिवजयंती निमित्ताने रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:23 AM2021-02-21T04:23:42+5:302021-02-21T04:23:42+5:30
धनकवडीतील उद्योजक ज्ञानेश्वर आणेराव व सह्याद्री ऑफ-रोडरच्या वतीने भारती विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ...
धनकवडीतील उद्योजक ज्ञानेश्वर आणेराव व सह्याद्री ऑफ-रोडरच्या वतीने भारती विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. लालमहाल, शनिवारवाडा, शिवाजीनगर येथील महाराजांचा पुतळा अशा विविध ठिकाणी ऑफरोड गाड्यांची रॅली काढण्यात आली.
यावेळी ज्ञानेश्वर आणेराव, वैभव शेलूकर, प्रकाश साळुंखे, मयूर घुले, नटराज तुपे, राज सूर्यवंशी, विक्रम मगर, नीलेश झेंडे, रमेश अहुजा, शंतनू पाटील, पृथ्वीराज भोसले, सिद्धार्थ पवार, सिद्धार्थ आणेराव, अक्षय अबनवे, ओमकार शिंदे, प्रतीक चरवड यांच्यासह सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट - छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. तरुणांनी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे देदीप्यमान कार्य यांचे स्मरण करून त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. - ज्ञानेश्वर आणेेराव