राम -रावण नवा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:42+5:302021-08-13T04:14:42+5:30
सज्जतेसाठी घोषणा : राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, खेळ खेळायचा कसा : समान संख्येचे दोन संघ करावेत. ...
सज्जतेसाठी घोषणा : राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की,
खेळ खेळायचा कसा :
समान संख्येचे दोन संघ करावेत. नाणेफेक जिंकणारा संघाचे नाव राम व दुसरा रावण गट. साधारण १० फूट अंतर मध्ये राहील अशा दोन रेषा आखून घ्याव्यात. त्या रेषांपासून दोन्ही बाजूला १५ ते २५ फूट अंतरावर एक रेषा आखून घ्यावी. ह्या मर्यादारेषा होय. दोन्ही गट समोरासमोर एकमेकांपासून १० फूट अंतरावर असलेल्या रेषेवर उभे करावेत. गटांची तोंडे एकमेकांकडे राहतील. शिक्षक कोणत्याही एका बाजूस मध्यावर उभे राहतील. प्रथम शिक्षकांनी खेळाडूंना सूचना देऊन खेळ सुरू करावा. शिक्षक गटास रा. रा. म्हणत एकदम राम किंवा रावण म्हणतील. शिक्षकांनी ज्या गटाचे नाव घेतले त्या गटाने आक्रमक बनून समोरच्या गटाकडे आक्रमण करावे. समोरचा गट पाठीमागे वळून मर्यादारेषेबाहेर जोरात पळत जाईल. मर्यादा रेषेपर्यंत आक्रमक गटाने खेळाडूस स्पर्श केल्यास तो खेळाडू बाद. बाद खेळाडूस खाली बसवून परत खेळ सुरू करावा व शिक्षकांनी राम किंवा रावण असा समयसूचकतेने व फसवून शब्द उच्चारावा की जेणेकरून खेळाडूंचा गोंधळ होईल. सर्व गडी बाद होणारा गट पराभूत, विजयी संघाचे अभिनंदन करावे
सचूना : हाच खेळ बगळा-कावळा असाही खेळता येईल.