‘राम मंदिर बांधूनच दाखवावे’ - संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:30 AM2017-12-10T03:30:20+5:302017-12-10T03:30:36+5:30
अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर बांधायचेच आहे, पण ते सारखे सांगत कशाला बसता? सरसंघचालक मोहन भागवतांनीही ते सांगण्याची गरज नाही. तुमचे सरकार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर बांधायचेच आहे, पण ते सारखे सांगत कशाला बसता? सरसंघचालक मोहन भागवतांनीही ते सांगण्याची गरज नाही. तुमचे सरकार आहे, एक अध्यादेश काढा व मंदिर बांधूनच दाखवा, कोर्टबाजीत अडकू नका अशा उपहासात्मक शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला सल्ला दिला.
शिवसेनेच्या नूतन पदाधिका-यांची भेट घेण्यासाठी खासदार राऊत पुण्यात आले होते. शिवसेनेच्या डेक्कन येथील कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भाजी विकली आहे. ते देशाचे संरक्षणमंत्री झाले. शिवसेनेचे बहुतेक नेते असेच गरिबीतून वडापाव विकत, संघर्ष करत नेते झाले. त्यांच्यापैकी कोणीही आज मी वडापाव विकत होतो असे सांगत नाही. मोदींनीही ते सांगू नये, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कायम ठेवावी. भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यांना शिवसेनेत घेणार का असे विचारले असता राऊत म्हणाले, ‘‘पटोले गेल्या ३ वर्षांपासून शेतक-यांची बाजू घेऊन भांडत आहेत.