रमणलाल शहा यांचा गौरव
By admin | Published: March 24, 2017 04:18 AM2017-03-24T04:18:58+5:302017-03-24T04:18:58+5:30
ज्योतिष क्षेत्रातील प्रशंसनीय कार्याबद्दल प्राचार्य रमणलाल शहा यांचा पुण्यातील ज्योतिर्विदांनी सत्कार केला.
पुणे : ज्योतिष क्षेत्रातील प्रशंसनीय कार्याबद्दल प्राचार्य रमणलाल शहा यांचा पुण्यातील ज्योतिर्विदांनी सत्कार केला.
प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अॅकॅडमीच्या विद्यमाने टिळक स्मारक मंदिर येथे मोफत ज्योतिष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सत्कार करण्यात आला.
प्राचार्य रमणलाल शहा यांचे ज्योतिष क्षेत्रातील कार्य हे प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेत विवाह, विवाहास विलंब, घटस्फोट, प्रेमविवाह, आर्थिक लाभ, अधिकार, प्रतिष्ठा या संदर्भातील अनेक पत्रिका देऊन त्याचे सोदाहरण विवेचन करण्यात आले. महात्मा गांधी, पंडित, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नरेंद्र मोदी, नेताजी सुभाषचंद्र बोस, धीरूभाई अंबानी तसेच जागतिक कीर्तीचे हिटलर, नेपोलियन, चर्चिल, रॉकफेलर इत्यादींच्या पत्रिका विश्लेषणासह सादर केल्या.
चंद्रकांत शेवाळे, बी. जी. पाचर्णे, वासुदेव जोशी, सुहास डोंगरे, धुंडिराज पाठक, नवीनकुमार शहा, कांतिलाल मुनोत, विजय जकातदार, उदयराज साने, डॉ. मधुसूदन घाणेकर, दादा वाणी, श्रीकांत सबनीस, अॅड. एन. डी. फडके, अॅड. श्रीराम देव, महेश कुलकर्णी, रमण वेलणकर, गोविंंद कोष्टी, नेहा शहा, भूपेंद्र शहा उपस्थित होते. (प्रतिनिधी)