रामदास आठवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरले; दिलीप मोहिते पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 08:04 PM2022-04-14T20:04:47+5:302022-04-14T20:05:01+5:30

केंद्राचा सध्याचा कारभार पहाता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल अशी भीती

Ramdas Athavale embraced the whole society for his own benefit said Dilip Mohite Patil | रामदास आठवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरले; दिलीप मोहिते पाटलांचा टोला

रामदास आठवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरले; दिलीप मोहिते पाटलांचा टोला

googlenewsNext

राजगुरुनगर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरले, असा टोला आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रामदास आठवलेंना लगावला आहे. खेडमध्ये राजगुरुनगर येथे एसटी बसस्थानकासमोर भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

मोहिते पाटील म्हणाले, गेल्या सात वर्षांत आपल्या समाजाच्या वाट्याला काय आलं हे एकदा सांगा. फक्त रामदास आठवलेंचे कल्याण झालं. त्यामुळे एका माणसाच्या फायद्यासाठी संपुर्ण समाजाला वेठीस धरत असेल तर त्यांच्या मागे जाण्याची गरज नाही. असं म्हणत रामदास आठवले साहेब तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरु नका असा टोला राष्ट्रवादी कॉग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना भाषणात लगावला.

केंद्राचा सध्याचा कारभार पहाता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल

केंद्र सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पाठिंबा आहे. मात्र केंद्राचा सध्याचा कारभार पहाता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल. त्यामुळे रामदास आठवले तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी संपुर्ण समाजाला वेठीस धरु नका, समाजाचा बळी देऊ नका असं म्हणत यातून समाजाचा फायदा होणार नाही, झाला तर फक्त रामदास आठवलेंचाच फायदा होईल. केंद्र सरकारकडूनभाजपाच्या लोकांना एक न्याय आणि राज्यातील इतरांना वेगळ्या प्रकारची वागणुक दिली जाते, असा प्रकार राज्यात सुरु आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांनी तयार केलेली घटना सुद्धा बदलायला किंवा दुरुस्त करायला मागे-पुढे पाहणार नाही याची आम्हाला भीती वाटत असल्याचेत्यांनी यावेळी सांगितले आहे. 

Web Title: Ramdas Athavale embraced the whole society for his own benefit said Dilip Mohite Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.