रामदास आठवले म्हणाले, 'मोहन भागवतांची भूमिका योग्यच, प्रत्येकाने इतिहास शोधत बसू नये'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 01:07 PM2022-06-04T13:07:53+5:302022-06-04T13:10:03+5:30

पुणे : ज्ञानव्यापीवरून देशात सुरू झालेल्या वादावर न्यायपालिका देईल तो निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवा. मात्र, याचा अर्थ प्रत्येक ...

Ramdas Athavale says, 'Mohan Bhagwat's role is right, not everyone should be looking for history' | रामदास आठवले म्हणाले, 'मोहन भागवतांची भूमिका योग्यच, प्रत्येकाने इतिहास शोधत बसू नये'

रामदास आठवले म्हणाले, 'मोहन भागवतांची भूमिका योग्यच, प्रत्येकाने इतिहास शोधत बसू नये'

googlenewsNext

पुणे : ज्ञानव्यापीवरून देशात सुरू झालेल्या वादावर न्यायपालिका देईल तो निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवा. मात्र, याचा अर्थ प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नये. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका योग्यच असल्याचे मत केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

आठवले म्हणाले, प्रत्येकाने इतिहास शोधत बसण्याची गरज नाही. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला आहे. एकेकाळी सगळा देश बुद्धिस्ट होता. त्यानंतर हिंदू, मोगल आले. त्यामुळे मंदिरे, मशिदीही आल्या. परंतु आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करायचा असेल तर, प्रत्येक गोष्टीमध्ये वाद निर्माण करणे योग्य नाही.

Web Title: Ramdas Athavale says, 'Mohan Bhagwat's role is right, not everyone should be looking for history'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.