"आई-वडिलांचे जास्त ऐका, बायकोचे थोडेसेच ऐका...!"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:00 AM2022-11-23T10:00:29+5:302022-11-23T10:01:17+5:30
रोजगार मेळाव्यात २०० उमेदवारांना नियुक्तीपत्रे...
तळेगाव दाभाडे (पुणे) : आई-वडिलांमुळे आपण आहोत. आई-वडिलांचे जास्त ऐका, बायकोचे पण ऐका ; पण थोडेसेच!, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (दि. २२) तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ केंद्रातील कार्यक्रमात व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अंतर्गत आयोजित निवड झालेल्या २०० उमेदवारांना आठवले यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त मंत्रालयाचे महाप्रबंधक विजयकुमार एन. कांबळे, पोस्टमास्तर जनरल आर. के. जायभाये, रक्षा मंत्रालयाचे उप महाप्रबंधक प्रदीप महाडेश्वर, मिलिंद लाटकर, दर्शनलाल गोला, धीरज कुमार , सीआरपीएफ पुणे ग्रुप सेंटरचे प्रमुख डीआयजीपी राकेश कुमार उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मयोगी प्रारंभ या योजनेचे ऑनलाइन उदघाटन केले. देशभरातील ७१ हजार ५६ जणांना सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यापैकी पुणे विभागातील २०० जणांना मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. उप कमांडंट रमेशसिंह बिष्ट यांनी सूत्रसंचालन केले. कमांडंट कविंद्रकुमार चंद यांनी आभार मानले.