"संपूर्ण देश तुझ्यासोबत... " नऊवारीत दुचाकीवर जगभ्रमंती करणाऱ्या रमिला PM मोदींकडून शाबासकी!

By श्रीकिशन काळे | Published: March 24, 2023 04:59 PM2023-03-24T16:59:22+5:302023-03-24T17:05:21+5:30

पिंपरी-चिंचवड येथून सुरु झालेला प्रवास १५७२ किलोमीटर मोटरसायकल चालवत दिल्लीमध्ये पोहचला आहे...

ramila latpate who traveled the world on a two-wheeler in November, was congratulated by the pm narendra modi | "संपूर्ण देश तुझ्यासोबत... " नऊवारीत दुचाकीवर जगभ्रमंती करणाऱ्या रमिला PM मोदींकडून शाबासकी!

"संपूर्ण देश तुझ्यासोबत... " नऊवारीत दुचाकीवर जगभ्रमंती करणाऱ्या रमिला PM मोदींकडून शाबासकी!

googlenewsNext

पुणे : महिला दिनानिमित्त नऊवारी साडी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या चिंचवडच्या रमिला लटपटे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काही अडचण आल्यास नक्की सांग, असे बोलून पंतप्रधान मोदी यांनी रमाला शाबासकीची थाप दिली.

चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. आता ‘रमा’ (रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेअंतर्गत त्या जगभ्रमंती करत आहेत. मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा ९ मार्च रोजी प्रारंभ झाला. त्या ८ मार्च २०२४ ला पुन्हा भारतात परतणार आहे.

रमिला लटपटे नऊवारी नेसून, नथ घालून ४० देशात जगभ्रमंतीला निघाली आहे. पिंपरी-चिंचवड येथून सुरु झालेला प्रवास १५७२ किलोमीटर मोटरसायकल चालवत दिल्लीमध्ये पोहचला आहे. पंतप्रधानांनी स्वीय सहाय्यकाला बोलवून घेत रमिला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. रमिला म्हणाल्या, सहा खंड, ४० देशामध्ये नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणार आहे. लघुउद्योग, बचतगट आणि भारताच्या कलागुणांचा जगभर प्रसार करणार आहे. त्यामुळे पूर्ण भारत माझ्यासोबत आहे असा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांनी मला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत.

संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. तुला काहीही अडचण आली. तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साध, संपूर्ण सहकार्य केले जाईल. व्हिजाची समस्या सोडविली जाईल. माझे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: ramila latpate who traveled the world on a two-wheeler in November, was congratulated by the pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.