शहरात रामनामाचा जयघोष

By admin | Published: March 29, 2015 12:27 AM2015-03-29T00:27:03+5:302015-03-29T00:27:03+5:30

शहरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.

Ramnama's hailstorm in the city | शहरात रामनामाचा जयघोष

शहरात रामनामाचा जयघोष

Next

पुणे : शहरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. होम-हवन, रामजन्म, महाप्रसादाचे वाटप, भक्तिगीत कार्यक्रम, मिरवणुका, पालखी सोहळा आदी कार्यक्रम शनिवारी दिवसभर सुरू होते. त्यामुळे उपनगरे भक्तिमय वातावरणात चिंब झाल्याचे चित्र होते.

४रामनवमीनिमित्त प्रतिशिर्डी शिरगाव येथे सुहासिनींच्या हस्ते रामजन्म पाळणा गाऊन रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शीतपेय, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख ट्रस्टी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी उपस्थित होते.
४कॅम्प भागातील श्री सूर्यमुखी मंदिरामध्ये सत्यनारायण पूजा, आरती, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनजितसिंग विरदी, नगरसेवक अतुल गायकवाड, राजन परदेशी, विकास रेड्डी, प्रसाद गायकवाड, मुस्तफा शेख, संजय यादव, अमित रोपळेकर, पोलिस निरीक्षक, नितीन जाधव, मेजर सिंग कलेर, सूरज अगरवाल, भारत शेलार उपस्थित होते.
४भवानी पेठेतील मेहतर बाल्मिकी समाज पंचायतच्यावतीने राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिस्थापना व कलशाची स्थापना करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष शैलेंद्र जाधव, सरचिटणीस निलेश चव्हाण, मंगेश चंद्रमौर्य, बंडोपंत उमंदे, वीरदास चव्हाण, नगरसेवक सुधीर जानजोत, भिकाचंद मेमजाते, चंद्रकांत चव्हाण, दशरथ रामानंदी, सूर्यकांत चव्हाण, खेमचंद साळुंखे, किनोद मकवाना, सूरदास चव्हाण, रमेश चव्हाण, राजेंद्र धर्मराज, सतीश लालबिगे उपस्थित होते. श्री संत नामदेव शिंपी समाज मंदिरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी रजनी देशपांडे यांचे कीर्तन, दीपक कुलकर्णी व उज्वला शिंदे यांनी भक्ती संगीत व गुरूकृपा भजनी मंडळाने भजन सादर केले.
४नवयुग तरूण मंडळ श्री साईबाबा भव्य उत्सव समितीच्यावतीने होमहवन, आरती, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान मित्र मंडळाच्यावतीने रामनवमीनिमित्त श्री साईबाबा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी साईपूजन, साई आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले.
४ साईबाबा मंदिर उत्सव समितीच्यावतीने महापूजा, आरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हुसेन भाई, विशाल मोरे, गौरव व्हावळ, समीर शेख, कुणाल पूजानी, चिमन शेख, योगेश चाफेकर, प्रीतम व्हावळ, आशिष परदेशी, युसफ शेख उपस्थित होते.

धानोरीत विविध कार्यक्रम
धानोरी : येथील आनंद पार्कमधील साई मंदिरात रामनवमी व साई जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आनंदपार्क, भैरवनगर, महाराणा प्रताप चौक, आय्यप्पा उद्यान, छत्रपती शिवाजी चौक परिसरातून साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोलताशा व झांजपथक, भजनी मंडळे तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंडित हर्षकुमार दळवी व सहकारी यांच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक अनिल टिंंगरे, माजी नगरसेवक सुनील टिंंगरे, हनिफ शेख, अ‍ॅड. नानासाहेब नलावडे, सुनील खांदवे-पाटील आदी उपस्थित होते.

रामनवमी व जन्मोत्सव उत्साहात
धनकवडी : आंबेगाव पठार, धनकवडी, बालाजीनगर या भागांमध्ये उत्साहात राम जन्मसोहळा पार पडला. दुपारी रामचंद्रांच्या जयघोषात महिलांकडून पाळणा गाऊन, फुलांच्या वर्षावात व सुठंवडा वाटून राम जन्मउत्सव साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच महाअभिषेक, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी हरिपाठ यांबरोबरच हरिजागराचा कार्यक्रमही पार पडला. मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी होती. नगरसेवक अभिजित कदम, नगरसेविका कल्पना थोरवे, अ‍ॅड. संभाजी थोरवे यांच्या हस्ते व परिसरातील रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरतीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी रमेश दवे, जोशी गुरुजी, श्रीराम मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष रामचंद्र मोरे आदी उपस्थित होते. धनकवडीत राजर्षी शाहू बँक चौक ते धनकवडी गावठाणापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.


घोरपडीत विविध कार्यक्रम
घोरपडी : रामनवमीनिमित्त घोरपडी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बसंत हायस्कूल येथील राममंदिरात संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी बसंत हायस्कूलपासून तालिम चौकपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी प्रवीण कन्नन, कविराज स्वामी, मौला, रंजित पिल्ले, लॉरेन्स जोसेफ, आनंद उपस्थित होते. घोरपडी रेल्वे फाटक येथील साईमंदिरात महाअभिषेक, साईभजन, कीर्तन, महाप्रसाद भंडारा आयोजन करण्यात आले होते. योगेश शेलार, गणेश कांबळे, प्रकाश काळे, कैलाश साखरे, तुषार सावंत, रवी कदम, संदीप परदेशी राजेश साळुंके उपस्थित होते.
संगीत रामकथा
वारजे : वारजे, कोथरूड भागात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डहाणूकर कॉलनीतील राममंदिरात संगीत रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्या हस्ते आरती झाली. सुमारे १२ हजार लोकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी भाविकांची मंदिरापासून ते डहाणूकर सर्कल पर्यंत रांगा लागल्या होत्या. या वेळी नगरसेविका संगीता देशपांडे, श्याम देशपांडे उपस्थित होते. वारजे येथील श्री पावशा गणपती मंदिरातही अजितअप्पा मार्जिणे यांचे रामजन्म कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी वारजे पूल ते गणपती माथा मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. अरुण दांगट, दिनकर दांगट, बाळासाहेब पोळ, तानाजी खेडेकर, काळुराम दोडके, अनुप जोशी उपस्थित होते.
कोथरूडमध्ये आकर्षक सजावट
कर्वेनगर : कर्वेनगर परिसरात रामजन्म उत्साहात साजरा करण्यात आला. या भागातील मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि दिवसभर कीर्तन, प्रवचन, पठण, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गीते गायली. गुरुजन सोसायटीमधील मंदिरात आठ दिवस ग्रंथाचे वाचन करण्यात आले. आज पहाटेपासूनच अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मिरवणूक काढून दुपारी रामजन्म झाला. याप्रसंगी भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Ramnama's hailstorm in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.