मतदान केंद्रावर रॅम्प सुविधा बंधनकारक
By admin | Published: February 18, 2017 03:45 AM2017-02-18T03:45:00+5:302017-02-18T03:45:00+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ हजार ३६९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रावर
पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ हजार ३६९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रावर अपंग, वृद्ध आणि आजारी मतदारांना मतदान करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये, यासाठी शंभर टक्के केंद्रांवर तात्पुरते रॅम्प करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
जिल्ह्यात सध्या २७ लाख ९२ हजार मतदार आहे असून, हजार ते बाराशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात बहुतेक मतदान केंद्र शाळांमध्येच असल्याने रॅम्पची सुविधा असते. परंतु काही ठिकाणी ही सुविधा नाही व काही केंद्र पहिल्या मजल्यावरदेखील आहेत. अशा वेळी अपंग, वृद्ध लोकांना त्रास झाल्यास मतदान करण्यास टाळाटाळ होऊ शकते. याचा परिणाम मतदानावर होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे अंपग व वृद्ध मतदारांना मतदान करता यावे, यासाठी अशा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज, शौचालय, निवाऱ्याची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.