राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 01:30 PM2021-08-24T13:30:18+5:302021-08-24T13:58:37+5:30

‘उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा सवाल

Rane's statement is not supported! Understanding should be given before arrest; Chandrakant Patil's reaction | राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देराष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही

पुणे : राणेंची स्वत:ची एका कार्यपद्धती आहे. त्यांची, रावसाहेब दानवे यांची बोलण्याची एक बोलण्याची वेगळी स्टाईल आहे. त्यामधून एखादा आक्षेपार्ह शब्द आला असेल तर केंद्रीय मंत्र्याला थेट अटक होऊ शकते का? त्यावर काही समज देणं, म्हणणं हा भाग आहे की नाही. राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही.  अटक करण्यापूर्वी समज द्यावा अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मी नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हणत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची गोची होताना दिसत आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा सवाल 

देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या २० महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल त्यांनी केला.

राजकारणाचा स्तर खाली गेला, सगळ्यांनीच एकत्र बसून चर्चा केली पाहिजे

महाराष्ट्रातील राजकीय जीवन सुसंस्कृत होतं. त्यावर काय चालू आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रं बसून चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच मी राणेंच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण त्यांची शैली आहे. कोकणात ज्या पद्धतीने बोललं जातं तो अनादर नसतो, असं ते म्हणाले.

पुण्यात शिवसैनिक आक्रमक 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी गुडलक चौकात कोंबड्यांसह आंदोलन केले असून डेक्कन जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्याचा राज्यभरात निषेध होत असून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या वक्तव्यामुळे पुण्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत़ चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rane's statement is not supported! Understanding should be given before arrest; Chandrakant Patil's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.