दौंडला कोविड सेंटरमध्ये रंगला कॅरमचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:02+5:302021-04-26T04:09:02+5:30

दौंड: येथे सामाजिक बांधिलकीतून तयार करण्यात आलेल्या गुजराथी भवन कोविड केअर सेंटरमध्ये सध्या कॅरमचा डाव रंगत आहे. येथील रुग्णांना ...

Rangala Carrom's innings at Daundala Kovid Center | दौंडला कोविड सेंटरमध्ये रंगला कॅरमचा डाव

दौंडला कोविड सेंटरमध्ये रंगला कॅरमचा डाव

Next

दौंड: येथे सामाजिक बांधिलकीतून तयार करण्यात आलेल्या गुजराथी भवन कोविड केअर सेंटरमध्ये सध्या कॅरमचा डाव रंगत आहे. येथील रुग्णांना औषोधोपचाराबरोबरच नेहमी आंनदी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरेाबर दररोज सकाळी प्राणायम, योगासने देखील केली जात असल्यामुळे रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढली असून अनेकजण कोरोनामुक्तही झाले आहे.

गुजराथी भवन कोविड सेंटरवर दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णांच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांचे नियंत्रण आहे. या सेंटरमधील रुग्णांना आंनदीत ठेवण्यासाठी कॅरम खेळणे, वाचन, एकमेकांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करणे यांसारखे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमुळे रुग्णांच्या मनातील भीती कमी होत असून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यचे समोर आले आहे.

सामाजिक बांधिलकीतून एक एकरातील मंगल कार्यालय शिवजीभाई पोकार यांनी उपलब्ध करुन दिले. रोटरीचे अध्यक्ष सुशील शहा यांनी १५ बेड आणि इतर सुविधा दिल्या. स्वप्नील शहा यांनी ५० गाद्या ५० ऊशा, निलकमल लुंड ५० बेड , धरमजी लुंड १० बेड दिले रुग्णांची चहा व्यवस्था नित्यनियमाने रोहन जोगळेकर यांनी केली आहे. विद्युत आणि मंडप व्यवस्था रामेश्वर मंत्री , गणेश भोसले यांनी केली आहे.

सामाजिक बांधिलकीतून कोविड सेंटरची संकल्पना सुशील शहा आणि शिवाजीभाई पोकार यांच्या दृष्टिकोनातून पुढे आली त्यांच्या या संकल्पनेला प्रशांत पवार ,

रामेश्वर मंत्री , महेश राजोपाध्ये , राजू गजधने , निखिल स्वामी, सचिन कुलथे, निरंजन शेट्टी , सचिन गोलांडे, मनोज अग्रवाल , प्रमोद पवार , अमोल काळे, राजू गोलांडे, दीपक शहाणे यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत आहे. रुग्णांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी सामाजिक कार्यकर्ते अन्नधान्य तसेच किराणा मालाची व्यवस्था करीत आहे.

२५ दौंड

दौंड येथे गुजराथी भवन कोविड सेंटर मध्ये कॅरम खेळात दंग असलेले रुग्ण.

Web Title: Rangala Carrom's innings at Daundala Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.