घोडेगाव येथे रंगला कलगीतुऱ्याचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:03+5:302021-08-18T04:15:03+5:30
श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला घोडेगाव येथे पारावर कलगीतुऱ्याचा जंगी सामना होतो. गेली पन्नास वर्षे ही परंपरा आहे. परंतु मागील ...
श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला घोडेगाव येथे पारावर कलगीतुऱ्याचा जंगी सामना होतो. गेली पन्नास वर्षे ही परंपरा आहे. परंतु मागील दोन वर्ष कोरोना सुरू झाल्यापासून कुठलाही कार्यक्रम होत नव्हता. गावोगावी कार्यक्रम बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कुठं तरी कलावंतांना वाव मिळावा यासाठी घोडेगावमध्ये आंबेगाव तालुका भेदिक लावणी संघटनेचे अध्यक्ष शाहीर सखाराम गेनभाऊ घोडेकर यांनी कलगीतुऱ्याचा कार्यक्रम घेतला. वेळी कलगीवाले शाहीर दिनानाथ दातखीळे, शाहीर मच्छिंद्र लायगुडे, तर तुऱ्यावाले शाहीर आण्णाभाऊ चवरे व त्यांचे सहकारी भीमा पायगोडे, लक्ष्णम भांबरे तसेच शाहीर शिवाजी तुकाराम वाणी व त्यांच्या सहकार्यांनी सवाल-जबाबातून कार्यक्रमाला रंगत आणली.
या कार्यक्रमासाठी शाहीर सुखाराम गेनभाऊ घोडेकर, गुरू गोधाराम चौरे गुरूजी, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, किरणशेठ घोडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रोहिदासबुवा मारूती झोडगे, शाहीर नामदेव बबन घोडेकर, सखाराम राघुजी घोडेकर, शाहीर दामोदर ठकुजी झोडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.