रानगव्याचा मृत्यू... 6 ते 7 तास पळूनही कुणाला जखमी केलं नाही, पण स्वत:चा जीव सोडला

By महेश गलांडे | Published: December 9, 2020 03:23 PM2020-12-09T15:23:04+5:302020-12-09T15:24:23+5:30

बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले.

Rangavya's death ... No one was injured even after fleeing for 6 to 7 hours, but he left his own life | रानगव्याचा मृत्यू... 6 ते 7 तास पळूनही कुणाला जखमी केलं नाही, पण स्वत:चा जीव सोडला

रानगव्याचा मृत्यू... 6 ते 7 तास पळूनही कुणाला जखमी केलं नाही, पण स्वत:चा जीव सोडला

googlenewsNext
ठळक मुद्देबुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले.

पुणे - शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले होते. अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. गवा सदृश्य रानटी प्राणी सोसायटीत आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष महेश गोळे यांनी सांगितले. वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडले, मात्र काही वेळातच या प्राण्यानं आपला जीव सोडला. 

बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले. गवा चुकल्यामुळे बिथरला होता. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज वर्तवत पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले. मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशनानंतर गव्याला ताब्यातही घेतले. मात्र, काही वेळातच रानगव्याचा मृत्यू झाला. पुण्यातील या रानगव्याचे वृत्त सोशल मीडियात झळकताच, सोशल मीडियातून त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. अनेकांनी यावर मिम्सही तयार केले, तर काहींनी तुम्ही त्यांच्या जंगलात शिरलात, ते तुमच्या घरात शिरले, असे म्हणत त्यांची व्यथाही मांडली. 

मनुष्यवस्तीत आल्यानंतर गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत होता. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम होऊन रक्त येत होते. रानगवा बिथरल्याने प्रथम त्याला शांत करण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. तो बहूदा डूक्कर खिंडीतून रात्री आला असावा, मात्र नागरिकांनी म्हैस महणून दुर्लक्ष केले असावे, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी दीपक पवार यांनी ʻलोकमतʼ ला दिली होती. दरम्यान, बिथरलेल्या रानगव्याला बेशुध्द करण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने मदत कार्य काही काळ रेंगाळले होते.

अयो ! गवा पळाला...

एका झाडाखाली शांत उभा असलेला गवा तेथून बाहेर पडून नागरी वस्तीकडे पळाला. महात्मा सोसायटीच्या गेटवरून नागरी वस्तीकडे पळण्यात यशस्वी झालेला रानगवा भुसारी कॉलनी, गादिया इस्टेट, भारतीनगरमार्गे मुख्य पौडरसत्यावर आला आणि तेथून जूना कचराडेपोजवळील जंगलाकडे पळाला. त्याच्यामागे रेस्क्यू टीमबरोबरच अतिउत्साही नागरिक आरडा ओरड करीत पळत असल्याने गवा आणखीनच बिथरला होता. नागरिकांच्या प्रचंड गोंधळातच वन कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तीनवेळा डार्ट (भूलदेण्यासाठी फेकून मारायचे इंजेक्शन) मारले. त्यापैकी एक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर गव्याला जाळी टाकून पकडण्यातही आले. दरम्यान, सुदैवाने ६-७ किलोमीटर पळूनही गव्याने कोणालाही जखमी केलेले नाही. मात्र, स्वत:चा जीव गमावला. 

तब्बल 3 तासांनंतर रानगवा जाळ्यात

तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर रानगवा कोथरूडमधील पौड रस्त्यावरील भारतीनगर सोसायटी ऋतुगंध बंगला परिसरात जाळ्यात अडकला आणि भुलीच्या इंजेक्शनमुळे बेशुध्द पडला. त्यानंतर, वन विभागाने त्यास गाडीतून नेले, पण काही वेळातंच त्याने आपला जीव सोडला. 
 

Web Title: Rangavya's death ... No one was injured even after fleeing for 6 to 7 hours, but he left his own life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.