कलाविष्कारांचे दर्शन घडविणारे रंगसप्तक प्रदर्शन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:01+5:302021-01-13T04:23:01+5:30
पुणे : निसर्ग, गड-किल्ले, अमूर्त शैलीतील चित्रे, व्यक्तिचित्रे, सर्जनात्मक चित्रे अशा विविधरंगी कलाविष्कारांचे दर्शन ‘रंगसप्तक’ कलाप्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना घडणार ...
पुणे : निसर्ग, गड-किल्ले, अमूर्त शैलीतील चित्रे, व्यक्तिचित्रे, सर्जनात्मक चित्रे अशा विविधरंगी कलाविष्कारांचे दर्शन ‘रंगसप्तक’ कलाप्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना घडणार आहे. अनलॉकनंतरचे पहिले सतरंगी कलाप्रदर्शन रविवार ( दि.१०) पासून बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात सुरू झाले आहे.
लॉकडाऊन काळात शालेय कामकाज सांभाळत चित्रकार म्हणून कलाक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कला शिक्षकांच्या कलाकृतींचे हे प्रदर्शन दि. १२ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत रसिकांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अरुण लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वाती पोकळे, किरण सरोदे, हुसेन खान उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
‘रंगसप्तक’ हा क्रियाशील कला शिक्षकांचा समूह आहे. या समूहातील प्रत्येक कलाकारांचे काम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रदर्शनात सुमारे 200 चित्रांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये सात कला शिक्षकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये दिलीप पवार, हरेश पैठणकर, संदीप शेटे, मोहन चार्य, राजेंद्र अवधूतकर, मोहन देशमुख, हनुमंत तोडकर यांचा समावेश आहे.
-----------------------------