चार उदयोन्मुख कलाकारांना ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्ती जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:32+5:302021-07-20T04:08:32+5:30
पुणे : महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे अभिजित बारटक्के, अमृता मापुस्कर, प्रशांत पाटील आणि सच्चिदानंद नारायणकार या चार उदयोन्मुख कलाकारांना ...
पुणे : महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे अभिजित बारटक्के, अमृता मापुस्कर, प्रशांत पाटील आणि सच्चिदानंद नारायणकार या चार उदयोन्मुख कलाकारांना ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्ती जाहीर झाली आहे.
नृत्य, नाट्य, संगीत आणि दृश्यकला या चार क्षेत्रांतील प्रत्येकी एका उदयोन्मुख तरुण कलाकाराला सेंटरतर्फे दरवर्षी रंगसेतू अभ्यासवृत्ती दिली जाते. दरमहा दहा हजार रुपये याप्रमाणे एक वर्षासाठी १ लाख २० हजार रुपये असे या अभ्यासवृत्तीचे स्वरूप आहे. संगीत क्षेत्रासाठी अभिजित बारटक्के, नाट्य क्षेत्रासाठी अमृता मापुस्कर, दृश्यकला क्षेत्रासाठी प्रशांत पाटील आणि नृत्य क्षेत्रासाठी सच्चिदानंद नारायणकार या चौघांची यंदाच्या अभ्यासवृत्तीसाठी निवड झाली आहे.
डॉ. चैतन्य कुंटे (संगीत), डॉ. अजय जोशी (नाट्य), डॉ. नितीन हडप (दृश्यकला) आणि संध्या धर्म (नृत्य) या जाणकारांनी तज्ज्ञ म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या प्रमोद काळे यांनी समन्वयक म्हणून काम केले.
--------------------
..................