रांजणगावला कृषी दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:48+5:302021-07-03T04:07:48+5:30
राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ १ जुलै हा ...
राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ १ जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. युवकांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती केली, तर शेतीतून भरघोस उत्पन्न मिळते. युवकांनी शेती तंत्रज्ञान अवगत करून शेतीतून पालेभाज्या, कडधान्य एकूण प्रतवारीनुसार विभागणी केल्यास त्याला योग्य भाव मिळत असतो, असे कृषी अधिकारी संतोष सुतार यांनी सांगितले. या वेळी अध्यक्ष दादा कोळपे, गोटू रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. सद्गुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव या विद्यालयाचा कृषिदूत तेजस सुदाम रणदिवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.